महाराष्ट्र

शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारांची घोषणा

प्रचाराचा केंद्रबिंदू विकासाचा मुद्दा राहणार

मुंबई: महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आज स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यात शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते रामदास कदम, मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय शिरसाट, आशिष जयस्वाल, योगेश कदम, माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मंत्र्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री प्रताप जाधव, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, खासदार मिलिंद देवरा, माजी खासदार राहुल शेवाळे प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार यादी जाहीर करण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत पक्षाचे ज्येष्ठ नेते, मंत्री, खासदार, आमदार, प्रवक्ते आणि युवा नेते यांचा समावेश आहे. नगर परिषदांच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यभर प्रचाराचा झंझावात केला होता.

नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे ६२ हून अधिक नगराध्यक्ष विजयी झाले तर ८५० हून अधिक नगरसेवक निवडून आले. त्यामुळे पक्षात उत्साहाचे वातावरण आहे. आता २९ महापालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेकड़ून विकासाचा अजेंडा मतदारांपुढे सादर केला जाणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago