महाराष्ट्र

मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या संस्कारांचा वारसा शिवसेना पुढे नेत आहे: डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या संस्काराने शिवसेना आपली वाटचाल करीत आहे. त्यांच्या या शिदोरीवरच प्रत्येक संकटांचा सामना मोठ्या नेटाने होईल यात शंका नाही. हा वारसा शिवसैनिक सातत्याने नेत आहेत, असे मत आज विधान परिषद उपसभापती ना डॉ नीलम गोऱ्हे यांनी आज येथे व्यक्त केले.

त्या म्हणाल्या, मीनाताई ठाकरे यांचे अतिशय प्रेमाचे, श्रद्धेचे सहृदयतेचे संस्कार महाराष्ट्रातील संपूर्ण शिवसेना परिवार आणि शिवसेना महिला आघाडी तसेच शिवसैनिकांवर झालेले आहेत. त्यांच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात रुग्णालये, वाचनालये सुरु आहेत. या माध्यमातून अनेक शहरे आणि गावांमध्ये वाचन संस्कृती जोपासली जाते. रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात होत आहे. खोपोलीजवळ असलेल्या रमाधाम येथेही चंदुमामा वैद्य हे ज्येष्ठ नागरिकांची अविरत सेवा गेली अनेक वर्षे करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही मासाहेबांच्या संस्कारांची आठवण ठेवून आपले काम करीत आहेत.

मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त विधान परिषद उपसभापती आणि शिवसेना उपनेत्या ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मंगळवार (दि. ६) सप्टेंबर रोजी २०२२ रोजी शिवसेना भवन, पुणे येथे मासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी छ्त्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेना पुणे संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, संजय गवळी, महिला आघाडीच्या प्रमुख सविता मते, संगीता ठोसर, पल्लवी जावळे, स्वाती ढमाले, श्रुती नाझिरकर, युवासेना सचिव शर्मिला येवले, कार्यालय प्रमुख मकरंद पेठकर आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन महिला आघाडीच्या पुणे शहर संघटक सविता मते, संगीता ठोसर यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

17 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago