महाराष्ट्र

शिवसेना शिंदे गटाला धक्का! बड्या नेत्यान सोडली एकनाथ शिंदेंची साथ

मुंबई: पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, स्थानिक स्वाराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांनी आपआपल्या स्थरावर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान पक्षांतराला देखील वेग आला आहे. अनेक नेते सध्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत. महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये प्रवेश केला आहे.

मात्र आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाला राज्यात मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत आपल्या गटासह भाजपत प्रवेश करणार आहेत. शिवाजी सावंत हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचे बंधू आहेत. मात्र पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांत शिवाजी सावंत आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी शिवाजी सावंत यांनी फडणवीस यांची गुप्त भेट घेतली, या भेटीनंतर त्यांनी आज भाजपात जाणार असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन दिवसात शिवाजी सावंत, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी , युवासेनेचे पदाधिकारी आणि महिला आघाडीचे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका आहे. आगामी सोलापूर महानगरपालिका, पंचायत समिती आणि झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची सोलापूर जिल्ह्यात ताकद वाढणार आहे. दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करत दिल्या घरी सुखी राहा असा उपरोधिक टोला लगावला आहे. शिवाजी सावंत आणि त्यांच्यासह भाजपात जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा हा वैयक्तीत निर्णय असल्याचं यावर प्रतिक्रिया देताना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

खरगे यांच्या एका शब्दावरून भाजपाचे आकांडतांडव; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार

मोदी-शाह यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल वापरलेल्या भाषेची आठवण करून देत सपकाळांचा भाजपावर निशाणा मुंबई: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष…

12 तास ago

शेतकऱ्यांना नडाल तर तुरुंगात पाठवू! सक्तीच्या कर्जवसुलीवर एकनाथ शिंदेंचा इशारा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; हरसूलमध्ये १० हजार कुटुंबांना दिवाळी शिधावाटप नाशिक: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून सक्तीने…

12 तास ago

दुष्काळ निवारणासाठी ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन; शेतकऱ्यांची सक्तीची कर्जवसुली खपवून घेणार नाही!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाला इशारा; नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीचाही घेतला आढावा नाशिक : राज्यातील दुष्काळी…

12 तास ago

‘स्थगितीवाले नाही, तर प्रगतीवाले आहोत!’; सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा कायापालट होणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गंगापूर रस्त्याचे भूमिपूजन; अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन नाशिक: पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातील विकासकामांच्या माध्यमातून…

12 तास ago

शिरूर पोलिसांची अवैध दारु विक्रीवर कारवाई; दोन ठिकाणी छापा टाकत मुद्देमाल जप्त…

शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्री विरोधात पोलिसांनी जोरदार कारवाया सुरु केल्या असुन…

19 तास ago

बाभुळसर-करडे अष्टविनायक महामार्गावर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : एका गैरसमजातून झालेल्या वादातून तरुणाला लाकडी काठीने मारहाण करुन जखमी केल्याची…

19 तास ago