महाराष्ट्र

स्वप्ना पाटकरला न्याय देण्यासाठी शिवसेनेची महिला सेना मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार

गुन्हा दाखल झालेल्या संजय राऊतवर तातडीने कारवाई करा; शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची मागणी

ठाणे: उबाठा खासदार संजय राऊत यांच्या मानसिक छळाने त्रस्त झालेल्या स्वप्ना पाटकर यांना न्याय देण्यासाठी शिवसेना महिला आघाडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देणार आहे. २०१६ पासून संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांचा छळ केला आहे. राज्यात पुन्हा एकदा महाराष्ट्रात दिशा सालियन प्रकरण होऊ नये, यासाठी सरकारने तातडीने राऊत यांची चौकशी करावी आणि स्वप्ना पाटकरला न्याय द्यावा, अशी मागणी खासदार म्हस्के यांनी यावेळी केली. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तक्रारीला ९ वर्ष आणि गुन्हा दाखल होऊ तीन वर्षानंतरही राऊतवर पोलीसांनी कारवाई केली नसल्याने स्वप्ना पाटकर यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. त्यानंतर आज खासदार म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन पाटकर यांच्या न्यायाची मागणी केली. ते पुढे म्हणाले की, राऊत विरोधात वाकोला पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्ह्याची नोंद आहे. संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांना केलेली शिवीगाळ समाज माध्यमांवर उपलब्ध आहे. राऊत यांना कोण पाठिशी घालत आहे, राज्यसभा खासदाराला अशा प्रकारे महिलांचा छळ करण्याची कोणी विशेष परवानगी दिली आहे का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असताना त्यांची अद्याप चौकशी का झाली नाही, दिशा सालियनसारख्या तरुणीप्रमाणे आत्महत्या केल्यानंतरच स्वप्ना पाटकर यांना न्याय मिळेल का? स्वप्ना पाटकर या पुन्हा न्यायाची मागणी करत आहेत. त्यावर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांची भूमिका काय असा सवाल खासदार म्हस्के यांनी उपस्थित केला. स्वप्ना पाटकरला न्याय मिळवून शिवसेना महिला आघाडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देणार असल्याचे खासदार म्हस्के म्हणाले.

संजय राऊत हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, अशी खरमरीत टीका खासदार म्हस्के यांनी केली. राऊत २४ तास केवळ राजकारण करतात. त्यांनी राज्यात एखादी बालवाडी देखील सुरु केली नाही. आता राऊत शरद पवारांवर टीका करत आहेत, हे दुर्देव आहे, असे खासदार म्हस्के म्हणाले. शरद पवारांनी आतातरी राऊत सारख्या कपटी माणसाला दूर ठेवावा, असे खासदार म्हस्के म्हणाले. आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या आजच्या वक्तव्यावरुन त्यांची बांधिलकी हिंदूंशी नसून दंगल करणाऱ्या विशिष्ट समाजाशी आहे, त्यांचा हिरवा चेहरा आज समोर आला, अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

23 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

23 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

23 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

23 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

23 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

23 तास ago