मुंबई: पुण्यातील ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या शिवाजीनगर परिसराचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ असे करण्यात यावे, अशी विनंती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शासनाला केली आहे.
“पुणे शहरातील शिवाजीनगर मेट्रो सटेशनला छत्रपती शिवाजी महाराज नगर नाव देण्यात यावे. या मागणीसाठी (दि. २४) जून २०२४ रोजी शिवप्रेमी संघटनांच्या वतीने पदयात्रा आणि मोर्चे काढण्यात आले होते. त्यावेळी मेट्रो अधिकाऱ्यांनी नामांतराच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही”, असा औचित्याचा मुद्दा सभागृहात विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांनी मांडला.
यावेळी पीठासीन अधिकारी असलेल्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी, ” शिवाजीनगर हा परिसर शहराच्या मध्यवर्ती भागात असून, सामाजिक, ऐतिहासिक आणि राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. येथे अनेक लोकप्रतिनिधी आणि मान्यवर राहतात, या परिसराला छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नाव देण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे शिवाजीनगर परिसराचे नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर असे करण्यात यावे”, अशी शासनाला विनंती केली.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…