शिरूर तालुका

ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा उघडकीस आणून दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद …

ट्रॅक्टर व काकरीपाळी यंत्र असा एकूण २,००,०००/- रू. किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शिरुर (अरूणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं. १४६/२०२५ भा.न्या.सं. ३०३(२) प्रमाणे (दि. १) मार्च रोजी गुन्हा ट्रक्टर चोरीचा गुन्हा दाखल असून सदर गुन्हयातील फिर्यादी निलेश प्रकाश कोरेकर (वय ४०) रा. न्हावरे ता. शिरूर यांनी त्यांचे घरासमोरील ट्रॅक्टर व काकरी पाळी यंत्र कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेले असल्याची फिर्याद शिरूर पोलीस स्टेशनला दिलेली होती.

सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने समांतर रित्या सुरू करण्यात आला होता, तपासा दरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, चोरटयांनी ट्रॅक्टर चोरी करून न्हावरा रोडने करडे, रांजणगाव, निमगाव म्हाळुंगी मार्गे पुन्हा न्हावरा-शिक्रापूर रोडला ट्रॅक्टर आल्याचे आढळून आले. पुढे सीसीटीव्हीचा अभाव असल्याने ट्रॅक्टरचा माग काढण्यास पथकाला अडचणी येवू लागल्या, तांत्रिक विश्लेषणाचा आधार व गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळवून सदरचा गुन्हा हा इसम नामे समीर बापू कुंजीर रा. टाकळी भिमा ता. दौंड, जि पुणे याने त्याच्या साथीदारासह केला असून त्यांच्याजवळ न्यू हॉलंड कंपनीचा निळया रंगाचा ट्रॅक्टर आहे अशी बातमी तपास पथकाला मिळाली. त्या आधारे संशयिताचा शोध घेत असताना स्था.गु.शा.चे पथकाने (दि. १७) मार्च रोजी आरोपी नामे १) समीर बापू कुंजीर (वय २१) २) निखील दत्तात्रय ठाकर (वय 22) दोघे रा. टाकळी भिमा, ता. दौंड जि पुणे यांना बाबुराव नगर, शिरूर येथून ट्रॅक्टर सह ताब्यात घेतले. त्यांचेकडून गुन्हयात चोरी गेलेला न्यू हॉलंड कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर व काकरी पाळीचे यंत्र असा एकूण २,००,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

आरोपींना ट्रॅक्टर व काकरी पाळी यंत्रासह शिरूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले असून त्यांना मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता, मा. न्यायालयाने आरोपीना न्यायालयीन कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजु मोमीण, सागर धुमाळ यांनी केली असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

3 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

3 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

3 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

4 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

9 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

10 तास ago