कोल्हापूर: शासन आपल्या दारी हा कार्यक्रम काल मंगळवार (दि. 14) रोजी कोल्हापूर येथे राबवण्यात आला होता. महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एक मुस्लिम नवदांपत्य आपल्या चिमुकली सोबत मुख्यमंत्री महोदयांची भेट घेण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी आले आणि मुख्यमंत्री महोदयांची भेट घेण्याचा आग्रह करू लागले. बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी यांनी तात्काळ उपस्थित स्वयंसेवकांची भेट घालून दिली. भेट का हवी? कारण काय विचारले असता त्यांना मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मधून त्यांच्या २६ दिवसांच्या चिमुकलीच्या वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मधून आर्थिक मदत मिळाल्यामुळे आपल्या मुलीचे प्राण वाचले असून आम्हाला कृतज्ञता म्हणून मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानायचे आहेत असे सांगितले.
या ठिकाणी उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी तात्काळ, शासन आपल्या दारी उपक्रमाचे राज्य समन्वयक डॉ अमोल शिंदे, अमित हुक्केरीकर आणि प्रभाकर काळे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. माननीय मुख्यमंत्री महोदय यांस अवगत करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सादिक गुलाब मकुभाई या नवदांपत्याकडून आभार पत्र स्विकारले, आणि चिमुकलीला हातात ही घेतले. कौतुकाने या चिमुकलीला न्याहाळत शेजारी असलेल्या मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांस बाळाला दाखविले. आपल्या चिमुकलीचे प्राण वाचवल्याबद्दल सादिक गुलाब यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आभार मानले आणि सोबत स्वहस्ताक्षरात लिहून आणलेले एक आभार पत्र, कृतज्ञता म्हणून दिले. निघताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मुलीचे नाव काय ठेवलं आहे? या प्रश्नाला अतिशय भावनिक उत्तर देताना, तुमची आमच्या कुटुंबावर दुवा आहे. म्हणून आमच्या मुलीचे नाव हे आम्ही दुवाच ठेवणार असे चिमुकलीच्या आईने उत्तर दिले.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…