महाराष्ट्र

माजी पोलिस पाटलांचा मुलगा; पण एका घटनेमुळे सूरज चव्हाणांच्या राजकारणाला ‘ब्रेक’

मुंबई: कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यापुढे पत्ते फेकणारे छावा संघटनेचे पदाधिकारी विजय घाटगे यांना बेदम मारहाण करणारे सूरज चव्हाण यांच्याकडून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. या मारहाणीनंतर सूरज चव्हाण कोण आहेत, त्यांची राजकीय वाटचाल याबाबत उत्सुकता आहे. एका माजी पोलिस पाटलांचा मुलगा… निरंजन डावखरेंच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या संपर्कात ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशी चढती राजकीय कमान चढणाऱ्या सूरज चव्हाण यांच्या कारकिर्दीला मारहाणी घटनेमुळे ‘ब्रेक’ लागला आहे, हे मात्र नक्की.

सूरज चव्हाण हे मूळचे लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कारेवाडी गावचे आहेत. या कारेवाडी गावातच त्यांचे बालपण गेले आहे. चव्हाण यांचे वडिल गावचे पोलिस पाटील होते. विद्यार्थीदशेतच असतानाच चव्हाण हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या संपर्कात आले. डावखरे यांच्या माध्यमातून सूरज चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडले गेले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

सूरज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेससोबत असले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेच्या वेळी शपथ घेतली होती. त्यावेळी अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांना परत आणण्यात सूरज चव्हाण यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. तेव्हापासून ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. पण तत्पूर्वी एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युवकचे कार्याध्यक्ष होते.

आमदारांना परत आणण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली असली तरी त्यानंतर ते अजित पवार यांच्या निकट गेले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणाऱ्या पहिल्या काही नेत्यांमध्ये सूरज चव्हाण यांचा समावेश होता, त्यामुळे ते अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात आहेत.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांच्यावर पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. तसेच, पक्षाची भूमिकाही ते माध्यमांपुढे मांडत होते. त्यामुळे चव्हाण हे अनेक अर्थाने पक्षाच्या विविध भूमिका पार पाडत होते. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने ते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या ‘निर्धार नवपर्वा’च्या निमित्ताने राज्याच्या दौऱ्यात सहभागी झाले होते.

लातूरमध्ये पत्रकार परिषद सुरू असताना छावा संघटनेचे विजय घाटगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विधानसभेत रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री कोकाटे यांच्या निषेधार्थ तटकरे यांच्यापुढे पत्ते फेकले. आपल्याच गृहजिल्ह्यात आपल्याच पक्षाच्या नेत्याला अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले, याचा राग सूरज चव्हाण यांना आला असावा. त्यातूनच त्यांनी आपण जबाबदार पदावर असल्याचे त्यांचे भान सुटले असावे, त्यातूनच त्यांनी घाटगे यांना मारहाण केली. मात्र, त्यांचा हा आततायीपणा त्यांच्याच अंगलट आला आहे.

सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीवरून राष्ट्रवादीवर राज्यभरातून टीका होऊ लागली. अगोदरच कोकाटेंच्या प्रतापामुळे बॅकपूटवर गेलेल्या पक्षनेतृत्वाने सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला. मात्र, विद्यार्थीदशतेच राष्ट्रवादीसोबत जोडले गेलेल्या चव्हाण यांनी अवघ्या काही वर्षांतच पक्षाच्या महत्वाच्या पदापर्यंत मजल मारली होती. भावनेच्या आवेगात येऊन केलेल्या मारहाणीमुळे सूरज चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला आहे. सूरज चव्हाण यांचे बंधू कारेवाडी गावचे सरपंच आहेत, तर त्यांचे वडिल माजी पोलिस पाटील आहेत. सत्ताधारी पक्षात असल्यामुळे चव्हाण यांनी आपल्या गावात कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे. पण मारहाणीमुळे या सर्वांवर पाणी फेरले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…

4 तास ago

जवस तेलाचे उपयोग

जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…

8 तास ago

गॅसमुळे छातीत होणाऱ्या त्रासाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय

छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…

8 तास ago

पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…

9 तास ago

महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…

9 तास ago

पुण्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटना; चिमुकलीचा मृत्यू, तर मद्यधुंद कारचालकाच्या अपघातात दोघांचा बळी

पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…

9 तास ago