मुंबई: महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA) यांच्या वतीने राज्यातील एकल पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना सहाय्य, मार्गदर्शन आणि सक्षमीकरणासाठी विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.यासंदर्भातील तयार करण्यात आलेल्या पोस्टरचे प्रकाशन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मंत्रालय करण्यात आले.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, एकल पाल्य, समान संधी, सन्मान आणि सक्षमीकरण’ या विषयावरील व्याख्यानाद्वारे एकल माता आणि त्यांच्या पाल्यांच्या जीवनप्रवासातील विविध आव्हाने, त्यांच्या समोरील संधी तसेच शैक्षणिक आणि मानसिक बळकटीसाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या कार्यक्रमात राज्य संयोजक, साज एकल महिला समितीचे हेरंब कुलकर्णी हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी आणि MSFDA चे कार्यकारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणाकर यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे.
व्याख्यानामध्ये एकल पाल्य विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक संधी, समुपदेशन, करिअर मार्गदर्शन यांसह महाविद्यालयांमध्ये भेदभावमुक्त व समावेशक वातावरण निर्माण करण्यासाठी ‘मेंटॉरशिप सेल’ उभारणीसंदर्भात माहिती देण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम गुरुवार, दि. १८ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता (Webex) या ऑनलाइन माध्यमातून आयोजित करण्यात आला असून, नोंदणी विनामूल्य आहे. राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, अधिष्ठाता,विभागप्रमुख तसेच प्राध्यापकांचा या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…
अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…