महाराष्ट्र

कौटुंबिक वादातून पोलिस शिपायाची आत्महत्या

चंदगड: नागरदळे (ता. चंदगड) येथे मीरा-भाईंदर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलिस शिपाई दयानंद कृष्णा पाटील (वय ४२) यांनी मंगळवारी दुपारी कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दयानंद पाटील हे यापूर्वी लष्करी सेवेत १७ वर्षे कार्यरत होते. सध्या ते मीरा-भाईंदर येथे वाहतूक शाखेत पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात आणि पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरू होता. त्यातून त्यांनी आठ दिवसांपूर्वी पत्नी व मुलांना सासरच्या घरी पाठविले होते.

मंगळवारी सकाळी ते मुंबईहून गावी आले होते. दुपारी गावाबाहेरील शेतात पंच व दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत वाद मिटल्याचे सांगितले जात आहे. बैठकीनंतर त्यांनी हवेत दोनवेळा गोळीबार केला. उपस्थितांनी याबाबत विचारणा केल्यावर आनंदाच्या भरात गोळीबार केल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

हवेत गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पोलिस पाटलांमार्फत चौकशी सुरू केली. त्यावेळी पाटील यांनी सरावासाठी गोळीबार केल्याचे सांगितले. त्यानंतर ते घरातील एका खोलीत गेले आणि दरवाजा बंद करून स्वतःवर गोळी झाडली. गोळी लागल्याने गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वडील कृष्णा पाटील यांच्या फिर्यादीवरून नोंद करण्यात आली असून, पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले, पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे आणि उपनिरीक्षक आकाश भिंगारदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

19 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

19 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

19 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

19 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

19 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

19 तास ago