महाराष्ट्र

दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करा; शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

ठाणे: लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची खासदार डॉ. शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून खासदार डॉ. शिंदे यांनी याप्रसंगी शोक व्यक्त केला. यावेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, या अपघातातील १० जणांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच एकाचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या दोघांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले आहे. सात जखमी रुग्णांवरील धोका टळला असून या अपघातात आतापर्यंत एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली. मुंब्रा स्टेशनजवळ एक वळण आहे. तिथे अप लोकल आणि डाऊन लोकल जात असताना दोन्ही लोकलमधील काहीजण खाली पडले तर काहीजण ट्रेनच्या आतमध्ये पडले, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, कल्याण-कर्जत परिसरात मोठ्या संख्येने नागरिक राहतात. त्यामुळे या मार्गावर लोकल फेऱ्या वाढवणे आवश्यक आहे. प्रवासी संघटनांकडून लोकल संख्या वाढवण्याची वारंवार मागणी केली जाते. ठाणे-कल्याण पाचवी आणि सहावी मार्गिका सुरु झाल्यानंतर लोकल फेऱ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली, मात्र पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विस्तार होणे आवश्यक आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाचे काम सुरु आहे. हे काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा लोकल फेऱ्यांची संख्या आणखी वाढेल, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. कल्याणच्या पुढे तिसरी आणि चौथी मार्गिका तयार करण्याचे काम सुरु असून यासाठी जमीन अधिग्रहण केले जात आहे. लोकल फेऱ्या जेव्हा वाढतील तेव्हा गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपं जाईल. नव्या मार्गिका वाढवण्याबरोबरच १२ डब्ब्यांच्या लोकल १५ डब्ब्यांमध्ये परावर्तीत करणे तितकेच गरजेचे आहे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

रेल्वे प्रवाशांची दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी आहे, या मागणीचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु, असे आश्वासन खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी दिले. पूर्वी दिवा येथे जलद लोकलला थांबा नव्हता, मात्र आता दिवा येथे जलद लोकल थांबतात, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात पुन्हा शॉर्टसर्किट ऊसाच्या पिकाला आग…? दोन शेतकऱ्यांचे नुकसान

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एकीकडे दुष्काळात शेतकरी होरपळत असताना दुसरीकडे विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किट मुळे…

12 तास ago

महाराष्ट्राचे स्वतंत्र रासायनिक उद्योग धोरण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात; पालघरमध्ये मोठे औद्योगिक केंद्र उभारणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘इंडिया केम २०२६’मध्ये घोषणा; रासायनिक उद्योगातील गुंतवणूक आणि रोजगार दुप्पट करण्यावर…

16 तास ago

बिश्नोई गँगला महाराष्ट्रात खुली सूट दिली आहे का? फडणवीसांनी त्याला मुंबईत आणून चौकशी करावी

हर्षवर्धन सपकाळ यांचा महायुती सरकारवर घणाघात; ५०० कोटींच्या आरोपांची ईडी चौकशी करण्याचीही मागणी मुंबई: राज्यातील वाढती…

16 तास ago

‘SIR रद्द करा, ज्ञानेश कुमारांचा राजीनामा द्या!’ युवक काँग्रेसचा एल्गार; आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आंदोलन; अब्दुल समद यांचा आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा मुंबई: मुख्य निवडणूक…

16 तास ago

सत्तेसाठी मराठा-ओबीसी संघर्ष पेटवला; फडणवीस-शिंदेंनी महाराष्ट्राचे नुकसान केले!

विजय वडेट्टीवारांचा घणाघात; जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी नागपूर : मराठा आरक्षण आंदोलक…

16 तास ago

जेवणानंतर विड्याचे पान का खातात? कारण जाणून घ्या

जेवणानंतर पान खाण्याची पद्धत आपल्याकडे फार आधीपासून आहे. त्यामध्ये विविध मसाले तसेच फळांचे फ्लेवर घालून…

17 तास ago