महाराष्ट्र

मुंब्राजवळ झालेली रेल्वेची घटना अपघात नाही तर भाजपा सरकारने घेतलेले बळी

निष्क्रीय व अत्यंत बेजबाबदार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची हकालपट्टी करा

मुंबई: ठाण्याजवळच्या मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून ६ प्रवशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व मनाला चटका लावणारी आहे. कामावर जाण्यासाठी जीवाची पर्वा न करता रेल्वेला लटकत प्रवास करण्याची वेळ येते हेच अत्यंत विदारक आहे. हा रेल्वे अपघात नाही तर भाजपा सरकारने घेतलेले बळी आहेत, याची चौकशी तर केलीच पाहिजे पण घटनेला जबाबदार धरून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

रेल्वे अपघातावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गेल्या अकरा वर्षापासून महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता पायाभूत सुविधा आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार या पोकळ गप्पा ऐकत आहे. सुविधा आणि विकासाच्या नावाखाली टेंडर द्या आणि कमिशन घ्या हा खेळ महाराष्ट्रात सुरु आहे. सत्ताधारी, अधिकारी आणि ठेकेदार यातून गब्बर झाले आहे पण या भ्रष्टाचाराची किंमत मात्र सर्वसामान्यांना नागरिकांना आपला जीवाने चुकती करावी लागते आहे. सरकारने आता तरी जागे होऊन, इव्हेंटबाजी सोडून मुंबईकरांचे लोकल प्रवासात जीव जाऊ नयेत यासाठी तातडीने पावले उचलावीत.

मुंबई परिसरात लोकल हीच लाईफलाईन आहे, दररोज जवळपास ७५ लाख लोक लोकलने प्रवास करतात पण हा प्रवास अत्यंत खडतर व कठीण आहे. घरातून बाहेर पडलेली व्यक्ती घरी परत येईल का याची चिंता सारखी सतावत असते. लोकलमधील गर्दीमुळे दररोज अपघात होतात, कोणाचा ना कोणाचा तरी जीव जातो किंवा कायमचा जायबंदी होतो. लोकलमधील गर्दी कमी करून हा प्रवास सुखकर करावा यासाठी सातत्याने चर्चा होते, बैठका होतात पण पुन्हा ‘पहिले पाढे ५५’ अशी अवस्था आहे. एखादा अपघात झाली की तातडीने लोकलला बंद दरवाजे बसवण्याची घोषणा केली जाते पण कृती शून्य असते. रेल्वे प्रशासन हे मुर्दाड आहे, सुस्तावलेला अजगर आहे. सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सातत्याने लोकलच्या समस्यांवर आवाज उठवलेला आहे पण रेल्वे प्रशासन व सरकार यांची कुंभकर्णी झोप काही जात नाही. भाजपा सरकारला बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करायचा आहे, मुंबईकरांना बुलेट ट्रने नाही तर लोकल सेवा व्यवस्थित पाहिजे. पण रेल्वे प्रशासन व सरकार सर्वसामान्य मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहे आता हा खेळ थांबवा असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव एमआयडीसीत बेकायदा पिस्तूल बाळगणारा जेरबंद; ३५ हजारांचा गावठी कट्टा जप्त

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) परिसरात बेकायदेशीररीत्या विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या एका व्यक्तीला…

1 तास ago

सहा महिन्यांत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र’; जिल्हाध्यक्ष संजय पवारांचा मोठा दावा, ‘घड्याळ’ चिन्हावर लढणार निवडणुका?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे.…

1 तास ago

‘मित्रपक्षाची साथ मिळाली नाही’; पुण्यातील पराभवावर सचिन अहिरांची खंत, संघटना बळकट करण्याचा निर्धार

पुणे: विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी पुण्यात शिवसेनेला अपेक्षित यश न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त…

2 तास ago

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राची मोठी हानी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव…

2 तास ago

स्टार प्रवाहवर मोठा बदल! ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’च्या आगमनासोबत ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेचा निरोप

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवर कार्यक्रमांच्या वेळापत्रकात मोठे बदल सुरू असून प्रेक्षकांसाठी नव्या मालिकांची मेजवानी…

3 तास ago

‘गुंगी गुडिया’वरून राष्ट्रवादीचा काँग्रेसवर पलटवार; महिलांचा अवमान थांबवा, उमेश पाटील यांची मागणी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यावरील काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टवरून…

3 तास ago