महाराष्ट्र

विद्यापीठांत विद्यार्थी मराठी साहित्य संमेलने; चंद्रकांत पाटील यांच्या सूचना

१००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर आयोजन; युवा विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यावर भर

मुंबई: १००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित तसेच अभिमत विद्यापीठांमध्ये एकदिवसीय विद्यार्थी मराठी साहित्य संमेलने आयोजित करावीत, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. या संमेलनांमध्ये युवा विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग राहील, यासाठी विद्यापीठांनी विशेष नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

१००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीसंदर्भात राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत ऑनलाइन बैठक घेण्यात आली. मंत्रालयातील त्यांच्या दालनातून झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत पाटील होते. यावेळी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उपसचिव अशोक मांडे, अमोल मुत्याल, मराठी भाषा विभागाचे अधिकारी आणि विविध विद्यापीठांचे कुलगुरू ऑनलाइन उपस्थित होते.

१००वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे येथे २८ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत होणार आहे. या संमेलनाच्या निमित्ताने राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये विद्यार्थी मराठी साहित्य संमेलने आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे मराठी भाषेचा प्रसार होण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये साहित्याविषयी अधिक रुची निर्माण होण्यास मदत होईल, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

संमेलने वेगवेगळ्या तारखांना घेण्याच्या सूचना

सर्व विद्यापीठांनी विद्यार्थी साहित्य संमेलने एकाच दिवशी आयोजित न करता वेगवेगळ्या तारखांना घ्यावीत, अशी सूचनाही चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये होणाऱ्या साहित्यविषयक उपक्रमांना व्यापक स्वरूप मिळेल आणि विद्यार्थ्यांचा सहभागही वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ उपक्रम

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ हा उपक्रम राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. ३ ते १५ ऑक्टोबरदरम्यान विविध विद्यापीठांमध्ये साहित्य व मराठी भाषेशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.

मुंबई विद्यापीठात ३ ऑक्टोबरपासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ४ ऑक्टोबर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे ५ ऑक्टोबर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ६ ऑक्टोबर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे ७ ऑक्टोबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे ८ ऑक्टोबर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ९ ऑक्टोबर, मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर येथे १० ऑक्टोबर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ११ ऑक्टोबर, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक येथे १२ ऑक्टोबर, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे १३ ऑक्टोबर, संत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे १४ ऑक्टोबर आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे १५ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रम होणार आहेत.

तसेच नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई आणि संबंधित महाविद्यालयांमध्येही मराठी भाषा व साहित्याशी संबंधित विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लवंग आणि लिंबाचं पाणी, आरोग्यासाठी ठरते जादूई! पाहा तिखट-आंबट चवींचा खास उपाय

लिंबू आणि लवंग या दोन्ही गोष्टींचा वापर कशात ना कशात रोज भारतीय घरांमध्ये केला जातो.…

10 तास ago

संधीवात आणि सांधेदुखीत फायदे मंद आहे पंतजलीचे हे औषध

संधीवात, ज्यास इंग्रजीत Arthritis म्हटले जाते. ज्यात सांध्यात सूज आणि तीव्र वेदना होतात. शरीरातील रोगप्रतिकारक…

10 तास ago

शरीर सांगतं फुप्फुसं कमकुवत होत असल्याची लक्षण

जसजसं आपलं वय वाढत जातं शरीरही हळूहळू कमजोर होतं. त्यामुळे वाढत्या वयात लवकर थकवा येण्याची…

10 तास ago

‘घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा; विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यातील दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर असून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी…

11 तास ago

मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता; धिरज देशमुखांची सरकारकडे तातडीच्या मदतीची मागणी

मुंबई : मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत अपुरा व विस्कळीत पाऊस, पावसातील दीर्घ खंड, घटलेली मृदा…

11 तास ago

‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही’; एकनाथ शिंदे

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; तूर, सोयाबीनसह विविध पिकांचे नुकसान अकोला: कमी पर्जन्यमान आणि पावसातील प्रदीर्घ खंडामुळे…

11 तास ago