महाराष्ट्र

त्या तीर्थक्षेत्रांच्या प्रलंबित विकास कामांचे अंदाजपत्रक आठ दिवसांत सादर करा

मुंबई: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांनी समाज जागृती, स्वच्छता, ग्रामविकास आणि आध्यात्मिक क्षेत्रात केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्याचप्रमाणे, कौंडण्यपूर येथील रुक्मिणी मातेवर असंख्य भाविकांची श्रद्धा आहे. या तीनही पवित्र स्थळांच्या उर्वरित आणि अपूर्ण विकासकामांचा सविस्तर आढावा घेऊन, आठ दिवसांच्या आत त्याचे अंदाजपत्रक तयार करून शासनास सादर करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मोझरी, वलगाव आणि कौंडण्यपूर या तीर्थक्षेत्रांशी संबंधित प्रलंबित विकासकामांचा सखोल आढावा घेण्यात आला. या बैठकीला राज्याचे वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल (दूरदृश्य प्रणालीद्वारे), आमदार संजय बनसोडे, आमदार राजेश वानखेडे, आमदार संजय खोडके, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव डॉ. मनिषा वर्मा, अमरावतीच्या विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल (दूरदृश्य प्रणालीद्वारे), अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर (दूरदृश्य प्रणालीद्वारे), तसेच श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमाचे प्रतिनिधी जनार्दन बोथे व संबंधित संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, मोझरी, वलगाव आणि कौंडण्यपूर या तीनही पवित्र स्थळांशी संबंधित उर्वरित विकासकामांचे संपूर्ण अंदाजपत्रक तयार करून आठ दिवसांत शासनास सादर करा. ही कामे शासनाच्या माध्यमातून तातडीने पूर्ण करण्यात येतील. तसेच, या स्थळांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने सुरू करा. या पवित्र स्थळांच्या नियमित देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम, (ता. तिवसा, जि. अमरावती) यांच्याकडे सोपवण्यात येईल. जबाबदारी हस्तांतरित करताना संबंधित संस्थेचा उत्पन्नाचा स्रोत, व्यवस्थापन क्षमता आणि देखभाल कौशल्यांचा सविस्तर विचार करण्याच्या सूचना दिल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

9 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

9 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

10 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

10 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

10 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

10 तास ago