महाराष्ट्र

सुनेत्रा पवार यांचा निर्धार; ‘दादा उद्योगिनी’ आणि ‘NCP यूथ स्किल्स’ ॲपचे लोकार्पण

पुणे: “दादांनी तुम्हाला आणि मला दिलेला विकासाचा वारसा अर्ध्यावर सोडणे त्यांच्या शिकवणीत बसत नाही. दादांनी पाहिलेले प्रगत महाराष्ट्राचे स्वप्न आणि पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न आपल्या सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे. आज आपण ॲपचे उद्घाटन करत नाही, तर एका दूरदृष्टीला पुढे घेऊन जात आहोत,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

पुण्यातील बालेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिलांसाठी ‘दादा उद्योगिनी’ आणि युवकांसाठी ‘NCP यूथ स्किल्स’ या दोन ॲपचे लोकार्पण सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रेरणेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

‘दादा उद्योगिनी’च्या माध्यमातून महिलांना उद्योजकतेच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन, संधी तसेच त्यांच्या कौशल्याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर ‘NCP यूथ स्किल्स’च्या माध्यमातून युवकांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या, “आज आपल्यात आदरणीय अजितदादा नाहीत, हे वास्तव आहे. त्यांच्या जाण्याने माझ्या, तुमच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात निर्माण झालेली पोकळी कुणीही भरून काढू शकत नाही. एका क्षणात आपण सगळेच पोरके झालो. मात्र, मी तुमच्या डोळ्यात पाहते तेव्हा मला रडायचे नाही, तर लढायचे बळ मिळते.”

पुण्यात या उपक्रमाचा शुभारंभ होत असल्याचे विशेष महत्त्व असल्याचेही त्यांनी सांगितले. महिलांच्या शिक्षणासाठी पहिली शाळा पुण्यात सुरू झाली, तर तरुणांच्या स्वप्नांना आकार देणारी महाविद्यालये, उद्योग आणि स्टार्टअप्स मोठ्या प्रमाणात याच शहरात उभी राहिली आहेत. त्यामुळे महिलांच्या आणि युवकांच्या जीवनात या ॲपच्या माध्यमातून नवी आणि नाविन्यपूर्ण सुरुवात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“दादांना अश्रू कधीच आवडत नव्हते, कारण त्यांना काम आवडायचे. ते नेहमी म्हणायचे, ‘मी कामाचा माणूस आहे आणि कामाचाच माणूस आहे.’ त्यामुळे आज आपण केवळ ॲपचे उद्घाटन करत नाही, तर त्यांच्या दूरदृष्टीला पुढे घेऊन जात आहोत,” असे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.

या लोकार्पण सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे, युवक प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आदींनी विचार मांडले.

यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस खासदार पार्थ पवार, कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, युवती प्रदेशाध्यक्ष निर्मला नवले, आमदार सुनील शेळके, आमदार विक्रम काकडे, आमदार चेतन तुपे, आमदार माऊली कटके, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे, प्रदेश सरचिटणीस सूरज चव्हाण, अभिनेते अजिंक्य देव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला, युवती आणि युवक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…

13 तास ago

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

16 तास ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

16 तास ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

1 दिवस ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

2 दिवस ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

2 दिवस ago