महाराष्ट्र

वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देणे अजित पवारांची सत्तेसाठी लाचारी; हर्षवर्धन सपकाळ

अजित पवारांचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा टराटरा फाटला, मुस्लीम समाजाचा केला विश्वासघात

मुंबई: भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत सरकार मध्ये सहभागी झालो तरी शिव, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराचा वारसा सोडला नाही असे सांगणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा उघडा पडला आहे. भाजपा सरकारने आणलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन अजित पवार यांनी सत्तेसाठी भाजपापुढे लोटांगणच घातले असल्याचा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढे म्हटले आहे की, अजित पवार यांनी काका शरद पवार यांचा पक्ष भाजपाच्या मदतीने चोरून पक्षाचे नाव व चिन्हही घेतले व सत्तेसाठी धर्मांधशक्तीच्या बाजूला जावून बसले. आपण विकासासाठी सत्तेत सहभागी झालो असलो तरी पुरोगामी विचार सोडला नाही असे सातत्याने बिंबवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. एका इफ्तार पार्टीत सहभागी होत मुस्लीम समाजाला त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही, माफ केले जाणार नाही, अशा वल्गना केल्या. मुस्लीम समाजाच्या पाठीमागे आहे असे सांगून चार दिवस होत नाहीत तोवर पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन मुस्लीम समाजाचा विश्वासघात केला.

वक्फ विधेयक हे केवळ मुस्लीम समाजात दहशत बसवून लाखो एकर जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा डाव आहे. मुंबईत धारावीसह अनेक महत्वाच्या जमिनी एका विशेष उद्योगपतीला देण्याचा सपाटा भाजपा सरकारने लावला आहे. उद्या वक्फच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या जमिनी हे सरकार लाडक्या उद्योगपतींच्या घशातच घालणार आहे हे अजित पवार यांच्यासारख्या नेत्याला माहित नाही असे नाही पण सत्तेशिवाय राहू न शकणाऱ्या अजित पवारांनी खुर्चीसाठी भाजपासमोर लाचार होऊन विधेयकाला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी हा मुस्लीम समाजाला दिलेला धोका आहे. त्यामुळे अजित पवार यांचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत हे जनतेने लक्षात घेऊन सावध व्हावे असा इशाराही काँग्रेसचे प्रांताध्यक्षांनी दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

2 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

6 तास ago