महाराष्ट्र

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर सुषमा अंधारेंची भावनिक पोस्ट

“वहिनी सावध असा, झारीतील शुक्राचार्य ओळखा” असा सल्ला

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही दिवसांत घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्या जाण्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर लिहिलेल्या दीर्घ आणि भावनिक पोस्टने खळबळ उडवली आहे.

सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या ४८ तासांत सुरू झालेल्या राजकीय हालचालींवर तीव्र आश्चर्य व्यक्त केलं आहे. “दादांची चिता अजून शांतही झाली नाही आणि त्यांच्या राजकीय वारसदाराची चर्चा सुरू झाली,” असं म्हणत त्यांनी या घडामोडींना अमानवी आणि क्रूर ठरवलं आहे.

अंधारे यांनी अजित पवारांच्या शेवटच्या दर्शनाचा भावनिक प्रसंगही आपल्या पोस्टमध्ये मांडला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता विभागात निष्प्राण अवस्थेत असलेल्या अजित पवारांना पाहिल्याचा क्षण, सुनेत्रा पवार यांची स्थितप्रज्ञ अवस्था आणि त्या काळातील वातावरण याचं त्यांनी अत्यंत हळवे वर्णन केलं आहे.

दरम्यान, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होत असताना सुषमा अंधारे यांनी त्यांना थेट सल्लाही दिला आहे. “वहिनी सावध असा,” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही दिग्गज नेत्यांकडून होऊ शकणाऱ्या राजकीय डावपेचांबाबत त्यांनी इशारा दिला आहे. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारख्या नेत्यांचा उल्लेख करत “झारीतील शुक्राचार्य ओळखा,” असा सल्ला अंधारेंनी दिला आहे.

सुनेत्रा पवार यांचा शपथविधी भावनिकदृष्ट्या चुकीचा वाटू शकतो, मात्र दादांनी उभं केलेलं राजकीय साम्राज्य वाचवण्यासाठी हा निर्णय अपरिहार्य असल्याचं मतही अंधारे यांनी व्यक्त केलं आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या उदाहरणाचा उल्लेख करत, कठीण काळात नेतृत्व स्वीकारण्याचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं.

आपल्या पोस्टच्या शेवटी सुषमा अंधारे म्हणतात की, “आम्ही दादांचे राजकीय विरोधक असलो तरी महिला म्हणून जर सुनेत्रा पवार यांच्यावर अन्याय झाला, तर भगिनीभाव जपत आम्ही त्यांच्या सोबत उभे राहू.”सुषमा अंधारेंच्या या पोस्टमुळे सुनेत्रा पवारांचा शपथविधी, राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण आणि अजित पवारांच्या वारशाबाबतची चर्चा अधिक तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

2 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

5 तास ago