महाराष्ट्र

नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; घरामागे आढळला १८ वर्षीय हरिणीचा मृतदेह

तेलंगणातील भद्राद्री कोठगुडेम जिल्ह्यात खळबळ; शरीरावर जखमांच्या खुणा, शेजाऱ्यावर संशय; पोलिसांकडून सखोल तपास सुरू

तेलंगणा: तेलंगणातील भद्राद्री कोठगुडेम जिल्ह्यात एका १८ वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हरिणी असे या विद्यार्थिनीचे नाव असून, ती एका खासगी महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण घेत होती. कॉलेजला सुट्टी असल्याने ती आपल्या मूळ गावी आली होती. मंगळवारी ही धक्कादायक घटना समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, हरिणीची आई राजेश्वरी गावातील एका नातेवाईकाच्या घरी गेली होती. काही वेळाने घरी परतल्यानंतर हरिणी दिसून न आल्याने तिने तिचा शोध सुरू केला. त्यावेळी घरातील बाथरुमच्या मागील बाजूस हरिणी मृतावस्थेत आढळून आली.

मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा दिसून आल्याने तिच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला आहे. हरिणीच्या आईने शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीवर संशय व्यक्त केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, या व्यक्तीचा या घटनेत सहभाग असल्याचे अद्याप पोलिसांकडून निश्चित करण्यात आलेले नाही.

मोलमजुरी करून आईने शिकवले

काही वर्षांपूर्वी हरिणीच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर तिच्या आईने मोलमजुरी करून दोन्ही मुलींचा सांभाळ केला आणि त्यांच्या शिक्षणासाठी मोठे कष्ट घेतले. प्रतिकूल परिस्थितीतही हरिणी नर्सिंगचे शिक्षण घेत भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, तिच्या संशयास्पद मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यासाठी न्यायवैद्यक तसेच क्ल्यूज पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.

मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सध्या कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचा या घटनेतील सहभाग निश्चित झालेला नाही. हरिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि त्यामागील परिस्थिती काय होती, हे शवविच्छेदन अहवाल व तपासातून स्पष्ट होणार आहे. पोलीस सर्व शक्यता तपासत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली दूर…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : दिवाळी म्हटले की खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक…

23 तास ago

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

4 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

5 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

5 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

5 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

5 दिवस ago