नाना पाटेकर यांचा मोठा मुलगा दुर्वासा अडीच वर्षांचा असताना गेला. डोळ्यांच्या समस्येमुळे मुलाचं जगणं कठीण होतं, तरी नाना पाटेकर लोक काय म्हणतील याचा विचार करत राहिले.
अभिनेते नाना पाटेकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी आपल्या अभिनयातून चाहत्यांच्या मनात एक वेगळीच छाप पाडली आहे. ते त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच स्पष्ट बोलताना पहायला मिळतात. यावेळी त्यांनी त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल अनेक भाष्य केले. नाना पाटेकर यांनी सांगितलं की, ‘माझ्या मोठ्या मुलाला डोळ्याची समस्या होती. त्याला काही दिसत नव्हतं. तो काही पाहू शकतच नव्हतं. जेव्हा मी त्याला पाहिलं त्यावेळी मी असा विचार केला की, लोक काय विचार करतील. मी माझ्या मुलाचा विचारच केला नाही.
पुढे बोलताना नाना म्हणाले की, ‘मला माझ्या मुलाचा तिरस्कार वाटू लागला होता. जेव्हा जेव्हा मी त्याला पाहायचो, त्यावेळी नानाच्या मुलाबद्दल लोक काय विचार करतील असं वाटायचं. पण मी कधीच त्याला काय वाटतं, तो काय विचार करतो याचा कधी विचारच नाही केला. मी फक्त लोक काय म्हणतील याचं विचारात राहिलो.’
मुलाबद्दल सांगताना नाना म्हणाले की, ‘माझ्या मुलाबद्दल लोक काय विचार करतील याचा विचार मी करत बसलो पण त्याला काय वाटतय हे मी पाहिलच नाही. माझ्या मुलाचं नाव दुर्वासा होतं. त्याने आमच्यासोबत फक्त अडीच वर्ष घालवली. प्रत्येकाच्या आयुष्यात काही गोष्टी निश्चित असतात. कदाचित त्याचा तेवढाच काळ असेल.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…