महाराष्ट्र

पवार-ठाकरेंना टार्गेट करत म्हणाले…

मुंबई: मराठा समाजाने आरक्षणासंदर्भात केलेल्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्याने मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलन मंगळवारी मागे घेतलं. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. असं असतानाच आता भारतीय जनता पार्टीनेही फडणवीसांचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे फडणवीसांचं कौतुक करतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना थेट उल्लेख न करता तर उद्धव ठाकरेंचा थेट उल्लेख करत लक्ष्य करण्यात आलं आहे.

फडणवीसांनी समंजस संवेदनशीलता दाखवली

“मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत दीर्घकाळ सुरू असलेल्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. परंपरागत कुणबी नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याने कोणावरही अन्याय न होता अशा कुटुंबांना न्याय देणारा तोडगा काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील मोठा प्रश्न सन्मानजनक रीतीने मार्गी लावला याबद्दल त्यांचे अभिनंदन!” असं महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच, “राज्यातील प्रत्येकास न्याय मिळावा हा प्रत्येकाचा हक्क असून तो जपण्याची समंजस संवेदनशीलता त्यांनी दाखवली आणि आंदोलनाच्या नेत्यांनीही ती समजून घेतली याबद्दल त्यांचेही अभिनंदन,” असंही पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

शरद पवारांना केलं लक्ष्य

“या आंदोलनाची दिशा भरकटवून त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न स्वतःस जाणते मानणाऱ्या काही नेत्यांनी केला. मराठा आरक्षणाच्या आडून आपल्या मतांचे आरक्षण करण्याचा काहींचा डाव होता. इतक्या संवेदनशील विषयावरही मविआतील नेते राजकारण करीत महाराष्ट्र तापवण्याचा प्रयत्न करूत होते. त्यांचे हे प्रयत्न तसेच घटनेत दुरुस्ती केल्याखेरीज तोडगा शक्य नाही असे सांगत हा तिढा केंद्र सरकारच्याही गळ्यात घालण्याचा त्यांचा धूर्त प्रयत्न फडणवीस यांनी हाणून पाडला,” असं म्हणत थेट शरद पवारांचा उल्लेख न करता उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. शरद पवार यांनी या प्रकरणामध्ये केंद्र सरकारने लक्ष घालावं असं म्हटलं होतं. त्याचाच संदर्भ देत उपाध्येंनी आपल्या पोस्टमधून थेट नाव न घेता टोला लगावल्याचं दिसत आहे.

उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

“अन्यथा मार्ग निघाला नसताच, पण न्याय्य मागणीसाठी संघर्ष करणाऱ्या मराठा समाजातील पात्र कुटुंबांची फसवणूक झाली असती. उद्धव ठाकरे यांना या प्रश्नाचे फारसे ज्ञान नाही त्यामुळे सरकारला विरोध करण्याव्यतिरिक्त कोणतीच ठोस भूमिका न घेता त्यांनी मूग गिळून गप्प बसणे पसंत केले. तसेही त्यांना महाराष्ट्रातील कोणत्याही सामाजिक प्रश्नांची जाण नाहीच. आपल्याला अर्थसंकल्प कळत नाही, ऊसाचे राजकारण माहीत नाही, शेतीतले काही समजत नाही अशा अनेक बाबतीत त्यांनी स्वतःच तशी कबुली दिली आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नात सरकारच्या विरोधात राहण्याव्यतिरीक्त कोणतीच भूमिका न घेऊन याही मुद्द्यावर त्यांनी अप्रत्यक्षपणे तीच कबुली दिली,” असा टोला उपाध्ये यांनी लगावला आहे.

विरोधकांकडे लक्ष न देण्याचा समजूतदारपणा…

“एकंदरीत, महाराष्ट्रातील हा कळीचा मुद्दा, राज्य पेटविण्याचा प्रयत्न सुरू असताना यावर सन्मानजनक रीतीने मार्गी लावण्याचे श्रेय ज्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना जाते, तसेच श्रेय, या प्रश्नात अकारण मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांकडे लक्ष न देण्याचा समजूतदारपणा महाराष्ट्राने दाखविले त्या महाराष्ट्रातील जनतेला जाते

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago