महाराष्ट्र

धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद आता थांबायलाच हवा

फ्रिटाऊन, सिएरा लिओन: पहलगाम (जम्मू आणि काश्मीर) येथे जेव्हा हल्ला झाला, तेव्हा दहशतवाद्यांनी लोकांची धर्म विचारून हत्या केली. ते हिंदू आहेत का, मुस्लिम आहेत का, हे तपासून मग त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यांचा उद्देश म्हणजे भारतातील सामाजिक सलोखा बिघडवणे. हा दहशतवाद्यांचा तसेच पाकिस्तानचा हेतू स्पष्ट होता. धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद आता थांबायलाच हवा. असा इशारा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सिएरा लिओन येथून पाकिस्तानला दिला. तर याच पार्श्वभूमीवर आता भारताने ‘ दहशवादाविरोधात आता शून्य सहिष्णुता ” धोरण अवलंबिले आहे, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

पहलगाम (जम्मू आणि काश्मीर) येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या राजनैतिक प्रयत्नांचा भाग म्हणून खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सिएरा लिओन या देशाला २८ ते ३० मे २०२५ दरम्यान भेट दिली. या भेटीमागील उद्दिष्ट जागतिक स्तरावर दहशतवादाच्या गंभीर धोक्याविषयी जनजागृती करणे व आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवणे हे होते. या शिष्टमंडळाने सिएरा लिओनमधील विविध उच्चपदस्थ व्यक्तींशी विस्तृत चर्चा केली. यात संसदाध्यक्ष, संसद सदस्य व परराष्ट्र विषय समिती, संरक्षण उपमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा समन्वयक, कार्यवाह परराष्ट्र मंत्री तसेच सिएरा लिओनचे उपराष्ट्रपती यांचा समावेश होता. भारताचा दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुता धोरण या बैठकांमध्ये अधोरेखित करण्यात आले आणि दहशतवादविरोधी जागतिक ऐक्याची आवश्यकता ठळकपणे मांडण्यात आली.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा सिएरा लिओनच्या संसदेने तीव्र शब्दांत निषेध केला आणि हल्ल्यातील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांसाठी मौन पाळून श्रद्धांजली देखील वाहण्यात आली.

सिएरा लिओनचे उपराष्ट्रपती डॉ. मोहम्मद जुलडेह जल्लोह, यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत भारतातील दहशतवादी हल्ल्यातील मृत्युमुखी नागरिकांप्रती शोक व्यक्त केला आणि भारतासोबत ऐक्य दर्शवले. संरक्षण उपमंत्री कर्नल (निवृत्त) मुआना ब्रिमा मासाकोयी आणि विरोधी पक्षाचे उपनेते डॅनियल ब्रिमा कोरोमा यांनीही दहशतवादाचा तीव्र निषेध करत भारताच्या भूमिकेला ठाम पाठिंबा दर्शवला. मंत्री मासाकोयी यांनी अफ्रिकन देशांनीही त्वरित एकत्र येऊन दहशतवादाविरुद्ध लढण्याची गरज असल्याचे नमूद केले.

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सिएरा लिओनमधील विविध परदेशी राजन्यायिक अधिकाऱ्यांशी संवाद साधत दहशतवादविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्णायक कारवाईची गरज अधोरेखित केली. भारताविरुद्ध सीमापार दहशतवादी कारवाया घडवणाऱ्या, पाठिंबा देणाऱ्या व प्रायोजित करणाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलण्याचे आवाहन त्यांनी केले.

या शिष्टमंडळाने सिएरा लिओनमधील स्थानिक प्रसारमाध्यमे व भारतीय समुदायाशी संवाद साधला आणि भारत व सिएरा लिओनमधील दृढ मैत्रीचे पुन्हा एकदा स्मरण करून दिले. या भेटीचा समारोप संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि इतर जागतिक मंचांवर दहशतवादाविरोधात समन्वित कारवाई करण्याच्या आणि आंतरराष्ट्रीय शांततेच्या रक्षणासाठी पुढाकार घेण्याच्या आवाहनासह झाला.

या दौऱ्यादरम्यान खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सिएरा लिओन येथील संसद अध्यक्ष यांच्यासमवेत इतर संसदीय सदस्यांसह झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत भारत आणि दहशतवाद याबाबत विविध महत्वाच्या विषयांना अगदी आक्रमक पद्धतीने हात घालून थेट पाकिस्तानवर सडकून टीका देखील केली. पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला हा माणुसकीवर झालेला हल्ला असून पाकिस्तान या दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे टीका देखील त्यांनी यावेळी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

1 तास ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

14 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

14 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

14 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

14 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

14 तास ago