क्राईम

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना समोर आली. नदीच्या प्रवाहात तरंगत असलेला एका ३० ते ३५ वर्षीय अज्ञात पुरुषाचा मृतदेह अचानक समोर आला. धक्कादायक बाब म्हणजे, या पुरुषाचे हात-पाय दोरीने घट्ट बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

नदी पात्रात फुगलेल्या आणि छिन्नविछिन्न अवस्थेत आढळलेला हा मृतदेह साधारणतः महिनाभरापूर्वीचा असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेहाची झालेली दुरवस्था पाहता, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानेच हातपाय बांधून मृतदेह नदीच्या पात्रात फेकून दिला का? असा संशय व्यक्त केला जात आहे.

संबंदित प्रकार केवळ अपघात नसून एक थंड डोक्याने केलेला खून असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतदेह अनेक दिवस पाण्यात राहिल्यामुळे तो सडलेला आहे. त्यामुळे मृताची ओळख पटवणे पोलिसांसाठी सर्वात मोठे आव्हान आहे. हा अपघाती मृत्यू आहे, की पूर्ववैमनस्यातून किंवा भांडणातून झालेला खून? याचे गूढ उकलण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

शिक्रापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले की, ‘पोलिसांचं विशेष पथक मृताची ओळख पटवण्यासाठी आणि या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सर्व बाजूंनी कसून तपास करत आहे.’

शिरूर तहसिल कार्यालयाच्या गौण खनिज विभागाची ‘खुर्ची’ संध्याकाळी सहा नंतर खाजगी एजंटांच्या ताब्यात…?

शिरूर हादरलं! लॉजमध्ये युवतीवर 7 जणांचा आळीपाळीने अत्याचार; पाहा नावे…

Video: शिरूरमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच महिलेचा जीव गेल्याचा गंभीर आरोप…

शिरूर तालुक्यात गोळीबार करुन दहशत माजविणाऱ्या योगेश मचाले टोळीवर ‘मोक्का’…

शिरूर तालुक्यात हॉटेलसमोर तरुणाला काठ्यांनी मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

2 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

2 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

2 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

2 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

3 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

8 तास ago