महाराष्ट्र

खेड पंचायत समितीवर ठाकरे गटाचा झेंडा; १६ पैकी १२ जागांवर दणदणीत विजय

मुंबई: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल ९ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांचे निकाल स्पष्ट झाले असून राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटानेही लक्षणीय कामगिरी केली आहे. मात्र या सर्व निकालांमध्ये पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीचा निकाल राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

खेडमध्ये ठाकरे गटाचे एकहाती वर्चस्व

पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीत एकूण १६ जागांसाठी निवडणूक झाली होती. यापैकी तब्बल १२ जागांवर ठाकरे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली. जिल्हा परिषद निवडणुकीतही ठाकरे गटाने पाच जागांवर बाजी मारत आपली ताकद दाखवून दिली आहे.

‘गड आला पण सिंह गेला’

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांनी खेड पंचायत समिती जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. खेड-आळंदी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काळे यांनी कोणत्याही परिस्थितीत पंचायत समिती हातातून जाऊ नये यासाठी रणनीती आखली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्यांच्या समर्थक उमेदवारांनी विजय मिळवला.मात्र या निवडणुकीत उभ्या असलेल्या त्यांच्या भगिनी राजश्री जैद यांचा पराभव झाला. त्यामुळे ‘गड आला पण सिंह गेला’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजप-शिंदे गटाचा जोर निष्फळ

खेड पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गटानेही जोरदार प्रचार केला होता. अनेक बड्या नेत्यांच्या सभा झाल्या. मात्र ठाकरे गटाने स्थानिक पातळीवर संघटनबळाच्या जोरावर विजय खेचून आणला. विशेष म्हणजे खेड तालुक्यात कोणत्याही मोठ्या नेत्याची सभा न होता देखील ठाकरे गटाने प्रभावी कामगिरी केली.

या विजयामुळे पुणे जिल्ह्यात ठाकरे गटाने आपली पाळेमुळे अधिक मजबूत करण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. खेडचा निकाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

7 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

8 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

8 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

8 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

8 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

8 तास ago