महाराष्ट्र

मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून नवा वाद; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली: भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या अप्रकाशित पुस्तकावरून राजकीय वाद चिघळला आहे. पुस्तक अद्याप प्रकाशित झाले नसल्याचे प्रकाशन संस्था पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने स्पष्ट केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला होता. दरम्यान, पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने निवेदन जारी करत म्हटले की, “मनोज नरवणे यांच्या पुस्तकाच्या कोणत्याही प्रती छापलेल्या नाहीत. पुस्तकाचे सर्व हक्क आमच्याकडे असून ते अद्याप प्रकाशित, वितरित किंवा विक्रीसाठी उपलब्ध केलेले नाही.” तसेच पुस्तकाचा कोणताही भाग सार्वजनिक करण्यात आलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अनधिकृतरीत्या प्रसारित होणाऱ्या प्रती कॉपीराइट उल्लंघन असल्याचा इशाराही प्रकाशन संस्थेने दिला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले, “एकतर जनरल नरवणे खोटं बोलत आहेत किंवा पेंग्विन पब्लिकेशन्स खोटं बोलत आहे. मात्र मला वाटत नाही की नरवणे खोटं बोलतील.” त्यांनी नरवणे यांच्या ट्विटचा उल्लेख करत पुस्तकासाठी लिंक दिल्याचा दावा केला. “जर पुस्तक प्रकाशित झालेलं नाही, तर ते अ‍ॅमेझॉनवर कसं उपलब्ध आहे?” असा सवाल करत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. पुस्तकात नमूद केलेल्या काही बाबी सरकारसाठी अडचणीच्या असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, पुस्तकाच्या अनधिकृत प्रती लीक झाल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडे एफआयआर नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे.

‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या आत्मचरित्रात जनरल नरवणे यांनी आपल्या ४० वर्षांच्या लष्करी कारकिर्दीतील अनुभव मांडले आहेत. विशेषतः २०२० मधील भारत-चीन तणाव, पूर्व लडाखमधील परिस्थिती आणि ‘अग्निपथ’ भरती योजनेबाबत झालेल्या चर्चांचा उल्लेख पुस्तकात असल्याचे वृत्त आहे. या मुद्द्यांवरूनच वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान, संरक्षण मंत्रालय आणि लष्कराकडून पुस्तकाची छाननी सुरू असल्याने त्याचे प्रकाशन रखडल्याचे सांगितले जाते. संरक्षण दलाच्या नियमांनुसार सेवेशी संबंधित संवेदनशील माहिती प्रसिद्ध करण्यासाठी केंद्र सरकारची पूर्वपरवानगी आवश्यक असते.

एकीकडे प्रकाशन संस्था पुस्तक प्रकाशित झाले नसल्याचा दावा करत असताना दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

7 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

7 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

8 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

12 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

13 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

13 तास ago