महाराष्ट्र

सलमान खान भारतीय नागरिक, आरएसएसच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला तर त्यात गैर काय..

मुंबई: सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर राज्यात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले परखड मत व्यक्त केले.

पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रभक्त आणि देशभक्त संस्था असून गेल्या शंभर वर्षांपासून देशात कार्यरत आहे. आपत्ती आली त्या ठिकाणी संघ नेहमीच पुढे असतो. संघाच्या कार्यकर्त्यांच्या कणाकणात राष्ट्रभक्ती भरलेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, संबंधित कार्यक्रम मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. सलमान खान हा भारताचा नागरिक असून तो येथील परंपरा आणि संस्कृती मान्य करतो. त्यामुळे कार्यक्रम मुंबईत असताना त्याने उपस्थित राहण्यात गैर काय आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.सलमान खानच्या उपस्थितीवरून सुरू असलेल्या चर्चांवर शिंदे यांनी अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

10 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

13 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

14 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

14 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

14 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

15 तास ago