महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ठाकरेंचा सुरुंग! भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात दे धक्का

काँग्रेस, राष्ट्रवादीतूनही इन्कमिंग

मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या डोंबवलीमध्येच शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने भाजपसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

डोंबिवलीमधील शिंदेंच्या शिवसेनसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील 200 हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपश म्हात्रे यांनी पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना म्हटले की, हा शक्तीप्रवेश म्हणजे डोंबिवलीतील जनतेचा ठाकरे कुटुंबियांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आहे आणि ही लाट भविष्यात आणखी प्रबळ होणार आहे. या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पक्षाला मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास म्हात्रे यांनी व्यक्त केला.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील डोंबिवलीतील वाहतूक सेनेचे अध्यक्ष प्रवीण उर्फ पऊ साळवी, ग्राहक संरक्षण कक्ष उपशहर संघटक कैलास दिनकर सणस , काँग्रेसचे शिबू शेख यांच्यासह सुमारे 150 ते 200 कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

पलावात आमदारांनी घर घ्यावे 

कल्याण शीळ रोडवरील नवीन पलावा पूल कामाच्या दर्जावरून अद्यापही गाजत आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे सतत पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी जात आहेत. यावरून आता आमदारांनी तिकडेच घर घ्यावे म्हणजे उठलं की लगेच जाता येईल असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी त्यांना टोला लगावला आहे.

कामातून उत्तर देऊ…

कल्याण शीळ रोडवरील नवीन पलावा पुलाचे उद्घाटन झाले तोच तासाभरात हा पूल बंद करण्यात आला. पुलावरील रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याने दुचाकीस्वार घसरून काही अपघात झाले. पावसाने तर पुलावरील रस्त्याची दुरावस्थाच करून टाकली. यावरून विरोधकांनी म्हणजेच मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील व शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सत्ताधारी पक्षावर पुलाच्या कामावरून चांगलीच झोड उठवली आहे. यावर सत्ताधारी पक्षाचे आमदार मोरे यांनी विरोधकांना बोलायचे ते बोलू द्या, आमचे काम बोलेल असे उत्तर दिले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी म्हणजे निव्वळ राजकीय स्टंट; विरोधकांनी संसदेत चर्चेला यावे; एकनाथ शिंदे

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन संपले, तरी काँग्रेसकडून राजकारण सुरूच; शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवरून उबाठावरही निशाणा नवी दिल्ली:…

1 मिनिट ago

शिरुर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कामगिरी; सराईत दुचाकी चोर; पोलिसांच्या जाळ्यात

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरासह परिसरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी कारवाईचा…

1 तास ago

गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या कामाचा बोजवारा; वर्षभरातच भेगा अन् बांधकाम खचले

२३५ कोटींच्या कंत्राटातील अवघे १५ टक्के काम पूर्ण; वडेट्टीवारांकडून कंत्राटदार-अभियंत्यांना धारेवर धरत उच्चस्तरीय चौकशीची मागणी…

4 तास ago

‘बावनकुळ्या’ म्हणणं चालतं, मग ‘ठाणे की रिक्षा’वर एवढा संताप का?; गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर…

6 तास ago

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगांची ‘पंचाईत’! ५ दिग्गज कंपन्यांची मोठ्या भूखंडांसाठी मागणी; हजारो रोजगाराच्या संधी

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (DMIC) विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीमुळे छत्रपती संभाजीनगर पुन्हा…

6 तास ago

नियमित व्यायाम करण्याचे फायदे

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम असे वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात, कारण व्यायामाने…

6 तास ago