महाबळेश्वर: राजमाता जिजाऊ यांच्या मातृभक्तीचा, उच्च संस्कारांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार असलेला ऐतिहासिक ‘सुवर्णतुला’ प्रसंग यंदा ३६१ वर्षांचा होत आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. १८) श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे ‘३६१ वा सुवर्णतुला दिन महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे आयोजन श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी प्रतिकृती तुला पूजन, अभिषेक पूजा व दीपप्रज्वलन होणार आहे. त्यानंतर ‘लोकप्रबोधन’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
यावेळी राजमाता जिजाऊ सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून, आंतरराष्ट्रीय तिरंदाज खेळाडू आदिती गोपीचंद स्वामी हिचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. तसेच किल्ले स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येईल.
रात्री नऊ वाजल्यानंतर ‘पुन्हा फोक प्रबोधन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवासाठी शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…
नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…