महाराष्ट्र

राज्यातील महापालिका निकालात भाजपची मोठी मुसंडी; मुंबईत २५ वर्षांची ठाकरे सत्ता संपुष्टात

मुंबई: राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालात भाजपने जोरदार कामगिरी करत बहुतेक महापालिकांवर वर्चस्व मिळवले आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक महत्त्वाच्या शहरांत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने सत्ता मिळवली असून, मुंबई महापालिकेत तब्बल २५ वर्षांची ठाकरे गटाची सत्ता संपुष्टात आली आहे.

मुंबईत भाजप-महायुतीला बहुमत, ठाकरे युगाचा अंत

मुंबई महापालिकेत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने बहुमत मिळवले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार महायुती १२५ जागांवर निर्णायक आघाडीवर आहे. यामध्ये भाजपच्या ९५ तर शिंदे शिवसेनेच्या ३० जागांचा समावेश आहे.

ठाकरे गटाची युती ७५ जागांवर आघाडीवर असून, यामध्ये ठाकरे शिवसेनेच्या ६६ आणि मनसेच्या ९ जागा आहेत. स्वबळावर लढलेली काँग्रेस १५ जागांवर आघाडीवर आहे.

पुणे-पिंपरीत भाजपचा विजय; दोन्ही राष्ट्रवादींना धक्का

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्येही भाजपने वर्चस्व मिळवले आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवूनही अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत.

पुण्यात भाजप ९७ जागांवर आघाडीवर असून, दोन्ही राष्ट्रवादी मिळून केवळ १० जागांवर आघाडीवर आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप ८५ जागांवर आघाडीवर असून, येथे एकहाती सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुण्यात आमदार तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत यांचा पराभव झाला आहे.

लातूरमध्ये भाजपची सत्ता गेली

राज्यात भाजपची लाट असली तरी लातूर महापालिकेत भाजपला सत्ता गमवावी लागली आहे. ७० जागांपैकी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने मिळून ४१ जागा जिंकल्या आहेत. भाजपला केवळ २० जागांवर समाधान मानावे लागले असून, मागील निवडणुकीतील ३६ जागांपेक्षा ही मोठी घसरण आहे.

कोल्हापुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष

कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस ३४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला २६, शिंदे शिवसेनेला १५, राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या आहेत. येथे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची भूमिका निर्णायक ठरल्याचे दिसून येते.

सांगलीत भाजपचा दबदबा

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत भाजपने सर्वाधिक ३३ जागा जिंकत आघाडी घेतली आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी १३ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मालेगावमध्ये राजकीय उलथापालथ

मालेगाव महापालिकेत भाजपला केवळ २ जागा मिळाल्या आहेत. येथे इस्लाम पार्टीने ३४ जागांवर विजय मिळवत मोठी कामगिरी केली आहे. एमआयएमला २०, शिंदे सेनेला १८, समाजवादी पक्षाला ६ तर काँग्रेसला ३ जागा मिळाल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आघाडीवर

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजप ५२ जागांवर आघाडीवर आहे. शिंदे शिवसेना १४, एमआयएम २४ तर ठाकरे शिवसेना ६ जागांवर आघाडीवर असल्याची माहिती आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

52 मिनिटे ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

57 मिनिटे ago

शिंदे गटाला निकालाआधीच टेन्शन? ‘धनुष्यबाण ठाकरेंनाच मिळणार’; असीम सरोदे यांचा मोठा दावा

मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे…

1 तास ago

अष्टविनायक यात्रा म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम; जाणून घ्या आठही गणरायांचे महत्त्व

Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…

1 तास ago

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणाऱ्यांवर शिंदेंची खरमरीत टीका; ‘उबाठा’वर निशाणा

नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…

2 तास ago

राज्यभरात २९ सप्टेंबरला ‘रोजगार महाकुंभ’; महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा; चंद्रकांत पाटील

मुंबई: राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी…

2 तास ago