महाराष्ट्र

बुडाला जळतंय, डोंगराची आग विझवायला पळतंय; उद्धव ठाकरेंवर शिंदेंचा घणाघात

सोनम वांगचूक आंदोलनाच्या समर्थनावरून टीका; हिंदुत्व, मोदी सरकार, एनडीए, पेपर लीक आणि विरोधकांच्या भूमिकेवर एकनाथ शिंदेंची जोरदार टीका

मुंबई: दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिलेल्या पाठिंब्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी जोरदार हल्लाबोल केला. “बुडाला जळतंय आणि डोंगराची आग विझवायला पळतंय,” अशी बोचरी टीका करत त्यांनी उद्धव ठाकरे गटाची भूमिका “तुम लढो, हम कपडे संभालते हैं” अशी असल्याचा टोला लगावला.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, सरकारविरोधी कोणत्याही आंदोलनाला घरबसल्या पाठिंबा देणे ही उद्धव ठाकरे गटाची सवय झाली आहे. मात्र स्वतः कधीही रस्त्यावर उतरून नेतृत्व करण्याचे धाडस ते दाखवत नाहीत.

यावेळी त्यांनी विरोधकांवर देशात आणि राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. भारताची तुलना श्रीलंका, बांगलादेश किंवा नेपाळशी करणे हा राजकीय स्वार्थ असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा दावा त्यांनी केला.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकणारे आता रामरक्षा म्हणत आहेत. ‘जो राम का नाही, वो किसी काम का नाही’ हे त्यांना आता समजले आहे,” असे ते म्हणाले. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्यांसोबत सत्ता स्थापन करून उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सोडल्याचा आरोपही त्यांनी केला.

एनडीएची युती ही सत्तेसाठी नसून समान विचारधारेवर आधारित वैचारिक युती असल्याचे स्पष्ट करत शिंदे म्हणाले की, आम्ही कधीही बार्गेनिंग केले नाही आणि करणारही नाही.

पेपर लीक प्रकरणावर राहुल गांधी यांच्या टीकेलाही उत्तर देताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात टीईटी पेपर लीकचा कट पोलिसांनी वेळेत उधळून लावला असून एसआयटीमार्फत सखोल चौकशी सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

ठाण्यातील बेकायदा बॅनरप्रकरणी प्रशासनाला तातडीने सर्व बेकायदा बॅनर हटवण्याचे आदेश दिल्याचेही शिंदे यांनी सांगितले. तसेच शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना, प्रत्येक भेटीत राजकारण शोधू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

3 तास ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

17 तास ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

2 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

2 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

2 दिवस ago