महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांसाठी रणधुमाळी! महायुतीला ६ जागांचा फायदा, शरद पवारांच्या उमेदवारीकडे लक्ष

मुंबई: येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात खासदारांचा कार्यकाळ संपत असून, या निवडणुकीकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे. संख्याबळ पाहता यंदाच्या राज्यसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा होण्याची शक्यता असून, सातपैकी सहा जागा महायुतीच्या पारड्यात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागू शकते.

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ३७.५ मतांची आवश्यकता असते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशाचा थेट परिणाम आता राज्यसभा निवडणुकीवर होणार आहे. विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार भाजपाचे १३७, शिंदेसेनेचे ६० आणि राष्ट्रवादीचे ४१ आमदार आहेत. त्यामुळे भाजपाला चार, राष्ट्रवादीला एक आणि शिंदेसेनेला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडे केवळ एक जागा येऊ शकते.

दरम्यान, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार यांची उमेदवारी महत्त्वाची ठरणार आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार भूमिका मांडली आहे. “शरद पवारांसारखा नेता दिल्लीत असणं महाराष्ट्रासाठी गरजेचं आहे. ते महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहेत. आमच्याकडे त्यांना निवडून आणण्याइतकी ताकद आहे. कुणाकडे हात पसरण्याची गरज नाही,” असे राऊत यांनी स्पष्ट केले. पवारांनी राज्यसभा निवडणुकीत उभे राहावे, हीच महाविकास आघाडीची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोणाचा कार्यकाळ संपणार?

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एकूण १९ जागा असून, सध्या १२ जागा एनडीएकडे तर ७ जागा महाविकास आघाडीकडे आहेत. येत्या २ एप्रिल २०२६ रोजी शरद पवार आणि फौजिया खान (राष्ट्रवादी – शरद पवार गट), ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील, भाजपाचे धैर्यशील पाटील व भागवत कराड तसेच रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांचा कार्यकाळ संपत आहे.महायुतीच्या वाढलेल्या ताकदीमुळे यावेळी राज्यसभेतील राजकीय गणिते बदलणार असून, शरद पवार राज्यसभेच्या रिंगणात उतरणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून दहशत; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री धुडगूस

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…

2 तास ago

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…

2 तास ago

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…

2 तास ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

4 तास ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

21 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

1 दिवस ago