मनोरंजन

बिग बॉस मराठी! ‘पॉवर की’ टास्कमध्ये रुचिताची जीभ घसरली; दीपालीसोबत वाद विकोपाला

 

मुंबई: ‘बिग बॉस मराठी ६’ च्या घरात दिवसेंदिवस वादांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. प्रत्येक टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये जोरदार भांडणं होत असून त्यात रुचिता जामदार आणि तन्वी कोलते यांच्यातील वाद नेहमीच चर्चेत असतो. मात्र, अलीकडील ‘पॉवर की’ टास्कदरम्यान रुचितानं मर्यादा ओलांडल्याचं पाहायला मिळालं.

सुरुवातीला रुचिताचं राकेश बापटसोबत वाद झाल्यानंतर भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी तिला चांगलंच सुनावलं होतं. असं असतानाच पुन्हा एकदा टास्कदरम्यान रुचिताचं आक्रमक वर्तन समोर आलं आहे.

‘पॉवर की’ टास्कमध्ये तणाव

बिग बॉसने ‘पॉवर की’ मिळवण्यासाठी खास टास्क दिला होता. या टास्कमध्ये जोड्यांना निळी, पिवळी आणि गुलाबी रंगाची चावी पकडायची होती. संचालक ज्या जोडीकडे चावी नसेल, त्या जोडीला बाद करत होता. बाद झालेल्या जोड्या पुढे इतर जोड्यांना बाद करत होत्या.

या टास्कदरम्यान रुचिता–तन्वी आणि दीपाली–दिव्या या दोन्ही जोड्यांनी एकाच चावीवर पकड घेतली. यावेळी दीपाली चावी पूर्णपणे स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत असताना रुचितानं आक्रमक भाषा वापरली. “लाथ बसली ना तर गुडघा धरून पळाल,” असा इशारा तिनं दिल्याने वातावरण अधिकच तापलं.

दीपाली–रुचिता वाद विकोपाला

वाद वाढत असताना दीपालीनं रुचिताचा पाय खेचला. त्यावरून दोघींमध्ये शाब्दिक चकमक झाली. रुचितानं दीपालीसाठी वापरलेले शब्द प्रेक्षकांना धक्कादायक वाटले. “मी बिग बॉसमध्ये असेपर्यंत हिचं आयुष्य उद्ध्वस्त करणार,” अशा धमकीवजा वक्तव्यामुळे घरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण बनलं.या संपूर्ण गोंधळात अखेर ‘पॉवर की’ विशाल आणि ओमकार यांच्या जोडीला मिळाली.

भाऊच्या धक्क्यावर पुन्हा कारवाई होणार?

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ५’ मध्ये जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगांवकर यांच्यातील वादानंतर जान्हवीच्या वक्तव्यांवर कठोर भूमिका घेण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता रुचिताच्या वागणुकीवर रितेश देशमुख काय भूमिका घेतात, तिला पुन्हा भाऊच्या धक्क्यावर धारेवर धरलं जातं का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

2 दिवस ago