महाराष्ट्र

भाजप देशभर दंगली घडवण्याचा कट रचत आहे; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशभरात धार्मिक तेढ निर्माण करून २०२९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दंगली घडवण्याचे षडयंत्र भाजपाकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी केला. २००२ च्या गुजरात दंगलीप्रमाणेच वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून पश्चिम बंगालमधील दंगली ही त्याची सुरुवात असल्याचा दावा त्यांनी केला.

मुंबईतील Tilak Bhavan येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, पाच राज्यांच्या निवडणुकांपासून हिंदू-मुस्लीम द्वेषाचा अजेंडा राबवला जात आहे. धार्मिक ध्रुवीकरण करून आगामी निवडणुकांमध्ये राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

जनगणनेनंतर जानेवारी २०२८ मध्ये डिलिमिटेशन प्रक्रिया सुरू होणार असून, त्या समितीत कोणत्या निवृत्त सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करायची हेही आधीच ठरवण्यात आल्याचा दावा सपकाळ यांनी केला. डिलिमिटेशननंतरच्या मतदारसंघांचा आराखडाही तयार असल्याचे ते म्हणाले.

तामिळनाडूतील राजकीय घडामोडींवर बोलताना त्यांनी अभिनेता Joseph Vijay यांच्या पक्षासोबत आघाडी करण्याचा निर्णय स्थानिक नेते आणि पक्षश्रेष्ठींनी विचारविनिमयानंतर घेतल्याचे सांगितले. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी लढणाऱ्या पक्षांसोबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबई महानगरपालिकेतील कथित शौचालय बांधकाम भ्रष्टाचारावर टीका करताना सपकाळ यांनी भाजपावर निशाणा साधला. “भ्रष्टाचारासाठी भाजपाला संडासची जागाही कमी पडत आहे,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच Mohit Kamboj यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

4 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

4 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

19 तास ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

20 तास ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

1 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

1 दिवस ago