महाराष्ट्र

चिमुरडीसह वडिलांचाही गळफास घेतलेला मृतदेह झाडाला आढळला अन्…

बीड: बीडमध्ये वाढत्या गुन्हेगारीनं डोकं वर काढलं असता, बीडमध्ये आता काही लोकांच्या आत्महत्येतही वाढ होऊ लागली आहे. एका तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा झाडाला गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला. या घटनेनं बीडमध्ये एकच खळबळ उडाली. बीडच्या इमामपूर रोड परिसरातील या तीन वर्षीय मुलीचा मृतदेह झाडाला लटकवलेल्या परिस्थितीत दिसून आला. याआधी याच मुलीच्या वडिलांचा मृतदेह इमामपूर परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर मुलीचाही मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना 11 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.

गळफास घेत आत्महत्या की खून

दोन दिवसांपूर्वी मुलीचे वडील जयराम बोराडे या व्यक्तीने इमामपूर परिसरात गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतरच बोराडे यांनी आपली तीन वर्षांची मुलगी बेपत्त असल्याचं सांगितलं होतं. त्याच मुलीचा गेली दोन दिवसांपासून शोध सुरू होता. सकाळी याच परिसरात एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेमागे नेमकं कोण आहे? असा प्रश्न उपस्थित झाला असून याची माहिती अदयापही समोर आली नाही. संबंधित प्रकरणात ग्रामीण पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत दिसून आल्याने पोलिसही पेचात पडलेत.

मुलीला गळफास देऊन मारण्यात आल

संबंधित प्रकरणाचा पोलीस शोध घेत आहेत. नेमकी ही आत्महत्या आहे की चिमुरडीला गळफास देऊन मारण्यात आलं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित प्रकरण लवकरच पोलीस प्रशासन उघडकीस आणेल. दोन दिवसांपूर्वी वडिलही अशाच अवस्थेत एका झाडाला लटकलेल्या परिस्थितीत दिसून आले. त्यानंतर ही चिमुरडीही तशाच स्थितीत झाडाला लटकलेली दिसून आली. बीडमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या रामगड परिसरातील तरुणांनी एका लिंबाच्या झाडाला या चिमुकलीला गळफास घातलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. तेव्हा बीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

12 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

15 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

1 दिवस ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

2 दिवस ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

2 दिवस ago