महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांची सर्व खासदारांसोबतची बैठक म्हणजे वरातीमागून घोडे; महेश तपासे

मुंबई: केंद्रीय अर्थसंकल्पाला एक दिवस बाकी असताना विविध तरतुदींवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत महाराष्ट्राच्या सर्व खासदारांची बैठक बोलावणे म्हणजे वरातीमागून घोडे असेच म्हणावे लागेल अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प दिनांक १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. फक्त एक दिवस बाकी असताना, महाराष्ट्राच्या विकासासाठी खासदार केंद्रीय अर्थसंकल्पात सूचना कशा जोडू शकतात याबाबत आश्चर्य व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांना (दि. १) फेब्रुवारीला अर्थसंकल्प आहे हे आठवते का? असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील विकास कामांबाबत जर गंभीर असते तर त्यांनी किमान महिनाभरापूर्वी सर्व खासदारांची बैठक बोलावायला हवी होती आणि केंद्रसरकारच्या सर्व प्रकल्पांचा आणि विविध योजनांसाठीच्या आर्थिक वाटपाचा आढावा घ्यायला हवा होता आणि त्यानंतर अर्थमंत्रालयाकडे सूचना पाठवायला हव्या होत्या असेही महेश तपासे म्हणाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्व खासदारांची बैठक बोलावणे म्हणजे पब्लिसिटी स्टंटशिवाय दुसरे काही नाही अशी टीकाही महेश तपासे यांनी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

20 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

20 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

21 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago