महाराष्ट्र

मा.बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली हिंदुत्वाची व्यापक व्याख्या आजही मार्गदर्शक; डॉ. नीलम गोऱ्हे

शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विनम्र आदरांजली

मुंबई: “शब्दांनी मनाला भिडणारा संवाद, विचारांनी हक्क आणि स्वाभिमान जागवणारा नेता, धैर्य आणि परखड भूमिकेचे प्रतीक म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. त्यांनी हिंदुत्वाची जी व्यापक व्याख्या दिली – ‘जो स्वतःला भारतीय म्हणतो तो हिंदू’ – ती आजही सर्वसमावेशक राष्ट्रवादी विचारधारेची दिशा दाखवणारी ठरते,” असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करताना केले.

हिंदुहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विधानपरिषद उपसभापती कार्यालयात डॉ. गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण केली. या प्रसंगी त्यांनी बाळासाहेबांच्या प्रेरणादायी कार्याचा तसेच त्यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत भावनिक श्रद्धांजली व्यक्त केली.

“माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी माझा अनेक वर्षांचा परिचय होता. १९९८ पासून त्यांच्या वाढदिवसाला, विजयादशमीला, संक्रांतीला आम्ही भेटायला जात असे. माझी काही पुस्तक प्रकाशने देखील त्यांनी स्वतः केलेली आहेत. मराठी माणसाचा स्वाभिमान, ८०% समाजकारण आणि २०% राजकारण, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्याची भूमिका ते दक्षिणेकडचे राजकीय प्रश्न असोत किंवा राष्ट्रीय मुद्दे – बाळासाहेबांचे नेतृत्व सदैव प्रभावी आणि तेजस्वी राहिले,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

“राजकारणात मला संजीवनी देणारे, योग्य संधी आणि दिशा देणारे बाळासाहेब ठाकरे होते. मी त्यांची कायम ऋणी आहे. आजही प्रत्येक स्मृतिदिन, जयंती किंवा महत्त्वाच्या प्रसंगी मी त्यांना अभिवादन करून प्रार्थना करते. त्यांना माझे हजार प्रणाम”, अशी कृतज्ञतापूर्वक आदरांजली डॉ. गोऱ्हे यांनी वाहिली

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

21 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

21 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

21 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

21 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

21 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

21 तास ago