महाराष्ट्र

नाशिकमध्ये ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्येच्या घटनेवर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे तीव्र दुःख

बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायद्यांची मागणी; आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी

मुंबई: नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या प्रकरणावर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. २४ वर्षीय आरोपी विजय संजय खेरनार याने अत्याचारानंतर मुलीची हत्या केली व फरार झाला होता. पोलिसांनी तत्काळ शोध घेत त्याला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “अशा नराधम प्रवृत्तीच्या व्यक्तींना कायद्याची आणि समाजाची भीती राहिली नाही. अनेक कायदे असूनही दोषसिद्धीचे प्रमाण केवळ २४ टक्के आहे, हे अत्यंत चिंताजनक आहे. गुन्हा झाल्यानंतर आरोपीला शिक्षा निश्चित मिळाली पाहिजे, तेव्हाच समाजात संदेश जाईल की अशा विकृतीला जागा नाही. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी माझी स्पष्ट मागणी आहे आणि त्या दिशेने मी स्वतः पाठपुरावा करणार आहे.”

पुढे बोलताना त्यांनी अत्याचार पीडित मुलींच्या कुटुंबीयांना सुरक्षित वातावरण देण्यावर भर देत सांगितले की, “अत्याचाराची तक्रार पालकांनी ताबडतोब केली पाहिजे. पोलिसांनीही नवीन भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करताना आवश्यक माहिती देणे बंधनकारक असल्याने त्वरित कार्यवाही झाली पाहिजे. साक्षीदार संरक्षण कायद्याचा प्रभावी वापर झाला तर आरोपी दोषी सिद्ध होण्याची शक्यता वाढू शकते.” डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणातही अत्यंत कठोर भूमिकेतून न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्य सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून आरोपीला तत्काळ कठोर शिक्षा व्हावी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी दोषसिद्धीचे प्रमाण आणि तपास प्रक्रिया मजबूत करावी, अशी मागणी त्यांनी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

23 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

23 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

23 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

23 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

23 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

23 तास ago