महाराष्ट्र

लाडक्या बहिणींची गर्दी म्हणजे शिवसेनेचा विजय निश्चित

पाणीपुरवठा, रस्ते, सुविधा आणि महिलांसाठी योजनांना प्राधान्य देणार असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

वाशीम: ज्या वेळी लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहतात त्या वेळी शिवसेनेचा विजय निश्चित असतो. वाशिम-मालेगाव नगरपंचायतीसह कारंजा नगरपरिषदेचा नवीन विकासाचा अध्याय आता लिहिला जाणार आहे. विकासाचे राजकारण नव्हे तर विकासाचे समाजकारण करायचे असून आता थेट अॅक्शन मोडवर काम होईल, असे शिवसेनेचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

मालेगाव येथील गुरांच्या बाजाराचे आधुनिकीकरण करून व्यापाराचे हायटेक केंद्र बनविण्यात येणार असल्याचे आश्वासन शिंदे यांनी मालेगावमध्ये झालेल्या सभेत दिले. वाशीम-मालेगाव नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश खुरसडे, कारंजा नगरपरिषदेच्या उमेदवार वैशाली येळणे आणि इतर उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. हरनारायण मंगल कार्यालय परिसरात झालेल्या सभेला मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणीसह लाडक्या भावांची उपस्थिती होती, त्यामुळे भगवा जनसमुदाय पाहून शिवसेनेची जोरदार लाट असल्याचे चित्र निर्माण झाले.

मालेगावमधील गुरांच्या बाजारात सध्या मूलभूत सोयींचा अभाव असून चिखल, पाणी आणि व्यवस्थेअभावी व्यापारास अडथळे येतात. या बाजाराचे आधुनिकीकरण करून जनावरांसाठी पक्के शेड, सुव्यवस्थित जागा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणार असून यामुळे नगरपालिकेचे उत्पन्न वाढेल आणि मालेगाव व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र बनेल, असे शिंदे म्हणाले.

पाणीपुरवठा, रस्ते आणि गटार यांसह मूलभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे सांगताना त्यांनी आधीच 65 कोटींचा पाणीपुरवठा प्रकल्प दिल्याची आठवण करून दिली. खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, कब्रस्तानासाठी जागा, मुलांसाठी उद्यान आणि मैदानाची उभारणी लवकरच करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महिलांसाठी सुरू असलेली ‘माझी लाडकी बहीण’ योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, महिलांना बचत गटांच्या माध्यमातून खेळते भांडवल देऊन आर्थिक सक्षम करण्याचे काम सुरू राहील, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

अनेक वर्षांपासून राहणाऱ्या नागरिकांना कायदेशीर हक्क देण्यासाठी अतिक्रमणे नियमबद्ध करण्यासह घरकुल प्रकरणे निकाली काढण्यात येतील, तर तरुणांना रोजगार आणि उद्योगांसाठी शासकीय स्तरावर मदत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. सभेच्या शेवटी शिंदे यांनी, “दोन तारखेला धनुष्यबाणाचे बटन दाबा आणि मालेगाववर भगवा फडकवा” अशा शब्दांत समर्थकांना आवाहन करत भाषणाची सांगता केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

22 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

22 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

22 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago