महाराष्ट्र

ऑनलाईन गेमिंगचा घातक विळखा! तीन सख्ख्या बहिणींनी गमावलं आयुष्य, पालकांमध्ये भीती

गाझियाबाद: ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे लहान मुलांचे आयुष्य धोक्यात येत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. गाझियाबादमधील भारत सिटी सोसायटीत तीन सख्ख्या अल्पवयीन बहिणींनी ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मृत मुलींचं वय अनुक्रमे १६, १४ आणि १२ वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार या तिन्ही बहिणींना गेल्या दोन वर्षांपासून टास्क-आधारित कोरियन लव्ह गेमचं तीव्र व्यसन लागलं होतं. याच नादामुळे त्यांनी शाळेत जाणंही बंद केलं होतं आणि त्या पूर्णपणे मोबाईल गेमच्या दुनियेत अडकल्या होत्या.

मंगळवारी रात्री उशिरापर्यंत त्या मोबाईलवर गेम खेळत असल्याचं कुटुंबीयांच्या लक्षात आलं. यावेळी घरच्यांनी त्यांना मोबाईल बाजूला ठेवण्यास सांगितलं, त्यावरून घरात वाद झाला. काही वेळातच, घरचे झोपेत असताना तिघींनी खोलीचा दरवाजा आतून बंद करून बाल्कनीतून खाली उडी घेतली. या घटनेत तिन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून त्यात,”मम्मी, बाबा, आम्हाला माफ करा. आम्हाला जो गेम सोडायला सांगत होतात, तो आम्हाला खूप प्रिय होता”असा मजकूर लिहिलेला आढळून आला आहे. या चिठ्ठीमुळे ऑनलाईन गेमिंगचं व्यसन किती टोकाचं असू शकतं, हे पुन्हा स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, अशाच एका घटनेत भोपाळ येथील अंश साहू या विद्यार्थ्याने मोबाईल गेमच्या व्यसनामुळे आत्महत्या केल्याची माहिती आहे. अंशला ‘ब्लू व्हेल’ आणि ‘फ्री फायर’ गेमचं व्यसन होतं. गेममधील टास्कचा मानसिक ताण आणि आर्थिक खर्चामुळे कुटुंबीयांनी त्याच्याकडून मोबाईल काढून घेतला होता. मात्र, तरीही त्याने टोकाचा निर्णय घेतल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं.

या घटनांमुळे ऑनलाईन गेमिंगवरील नियंत्रण, पालकांची भूमिका आणि मुलांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सरकारकडून अशा घातक गेम्सवर बंदी घालण्याची मागणी होत असतानाच, पालकांनीही मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवणं, त्यांच्याशी संवाद वाढवणं आणि गरज असल्यास मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.ऑनलाईन जग जितकं आकर्षक आहे, तितकंच ते धोकादायकही ठरत असल्याचं या घटनांमधून स्पष्ट झालं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कमी खाऊनही वाढतंय तुमचं वजन, या 5 सवयी ठरु शकतील जबाबदार

सध्या सर्वांना भेडसवणार एकच प्रश्न म्हणजे वजन कमीच होत नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी…

5 तास ago

रात्रीच्या जेवणानंतर इवलिशी वेलची चावून खा! एक नाही अनेक गुणकारी फायदे

रात्रीच्या जेवणानंतर आपल्यापैकी बऱ्याचजणांना गोड पदार्थ खाण्याचे क्रेविंग्स होतात. अशावेळी या गोड पदार्थांचे क्रेविंग्स भागवण्यासाठी…

5 तास ago

SIR वादावर NDAमध्येही मतभेद? कुशवाहांचा निवडणूक आयोगाला सवाल

नवी दिल्ली : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याभोवती सुरू…

5 तास ago

कडा हादरले! गणेश विसर्जन मिरवणुकीत १८ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला

जुन्या वादातून हल्ल्याचा संशय; छाती, पोट आणि हातावर सपासप वार, प्रकृती गंभीर; हल्लेखोरांचा शोध सुरू…

5 तास ago

मीटरवरील ‘हा’ लाल दिवा देतोय मोठा संकेत! वीजबिल वाढण्याआधीच कळू शकते कारण

मुंबई : घरातील इलेक्ट्रिक मीटर म्हणजे केवळ किती युनिट वीज वापरली याची नोंद करणारे उपकरण…

5 तास ago

विखे कुटुंबातील नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत

काका राधाकृष्ण विखे पाटलांपासून दशकभर संपर्क नसल्याचा दावा अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या विखे पाटील कुटुंबातील नीला…

5 तास ago