मुंबई: भविष्यातील महाराष्ट्र कसा असावा, याचा सविस्तर विकास आराखडा मांडण्यात आला असून “समृद्ध, सक्षम आणि संवेदनशील महाराष्ट्र” ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारा हा दृष्टिकोन असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या आराखड्यात सर्वसमावेशक व लोककेंद्रित विकास हा प्रमुख मुद्दा असून, विकासाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची भूमिका मांडण्यात आली आहे. शहर–ग्रामीण दरी कमी करत आदिवासी, महिला, शेतकरी, कामगार आणि युवकांना समान संधी देण्यावर भर देण्यात आला आहे.
आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करत प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, परवडणारी व वेळेवर वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी ग्रामीण भागात सुसज्ज रुग्णालये, डिजिटल हेल्थ सेवा आणि आपत्कालीन यंत्रणा सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार या त्रिसूत्रीवर आधारित धोरणातून महाराष्ट्र नोकरी मागणारा नव्हे, तर नोकरी देणारा राज्य बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. उद्योगाभिमुख शिक्षण, स्टार्ट-अप संस्कृती आणि नवकल्पनांना चालना देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
महिलांसाठी सन्मान, सुरक्षितता आणि स्वावलंबन या तीन स्तंभांवर आधारित धोरण राबवण्याची भूमिका मांडली आहे. लाडकी बहीणसारख्या योजनांचा विस्तार, स्वयंरोजगार आणि सुरक्षित सार्वजनिक व्यवस्था ही भविष्यातील महाराष्ट्राची ओळख असेल, असे नमूद करण्यात आले.
यासोबतच आधुनिक पायाभूत सुविधा, स्मार्ट शहरे, हरित ऊर्जा, जलसंवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि शाश्वत शेती यांद्वारे पर्यावरणस्नेही महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.
शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, हमीभाव, कृषी प्रक्रिया उद्योग आणि पाणी व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. तसेच पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि लोकाभिमुख प्रशासन हे विश्वासार्ह शासनाचे लक्षण ठरेल, असे मत मांडण्यात आले.
महाराष्ट्राची सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक एकात्मता जपत वारकरी संप्रदाय, कला, साहित्य, क्रीडा व लोककलेला प्रोत्साहन देण्यावरही भर देण्यात आला आहे. केंद्र–राज्य समन्वयातून मोठ्या प्रकल्पांना गती देत विकासाचा वेग वाढवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.भविष्यातील महाराष्ट्र केवळ आर्थिकदृष्ट्या प्रगत नव्हे, तर मानवी मूल्यांनी समृद्ध, सामाजिकदृष्ट्या न्याय्य आणि आत्मनिर्भर असावा, असा ठाम संदेश या विकास आराखड्यातून देण्यात आला आहे.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…