न्हावरे (अक्षय टेमगिरे) मांडवगण फराटा (ता. शिरुर) दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन ७२ वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीला हाताने तसेच लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सागर विश्वास गव्हाणे (रा. मांडवगण फराटा, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवराम श्रीपती इथापे (वय ७२, रा. मांडवगण फराटा, ता.शिरुर, जि.पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली असून गुरुवार (दि ६) रोजी दुपारी ४:१५ च्या सुमारास मांडवगण फराटा येथील वाघेश्वर मंदिराजवळ हि घटना घडली आहे.
आरोपीने फिर्यादीकडे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, इथापे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने त्यांना प्रथम हाताने मारहाण केली. त्यानंतर घटनास्थळी पडलेले लाकडी दांडके हातात घेऊन त्यांच्या तोंडावर, पाठीवर तसेच पायावर मारहाण केली.
या मारहाणीनंतर आरोपीने शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर इथापे यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार कदम करीत आहेत.
मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…
‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…
बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…
मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…