मुंबई: देशातील ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि प्रख्यात कादंबरीकार एस.एल. भैरप्पा यांच्या जाण्याने देशातल्या साहित्य विश्वातले पर्व संपले अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
भैरप्पा यांच्या अनेक कादंबऱ्यांचा मराठीमध्ये देखील अनुवाद झाला असून या कादंबऱ्यांनी मराठी म्हणाला अक्षरशः भुरळ पाडली असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणतात की, भैरप्पा यांच्या कादंबऱ्यांनी वाचकांना एका वेगळ्या भावविश्वात नेऊन सोडले. त्यांच्या लेखनातून संशोधन, अभ्यास आणि विचारांचे दर्शन घडते. त्यांचे साहित्य आजही वाचकांना खिळवून ठेवतात.
अनेक भाषांमधून अनुवादित झालेल्या त्यांच्या कादंबऱ्यानी वाचकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. भैरप्पा यांना साहित्य अकादमी पुरस्कार, सरस्वती सन्मान, पद्मभूषण, पद्मश्री आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. सकस लेखन करणाऱ्या या महान साहित्यिकास माझी भावपूर्ण श्रद्धांजली असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणतात.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …