शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे केटरींग व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाचे (वय ३९) अपहरण करून त्याच्याकडून महिन्याला एक लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. खंडणी न दिल्यामुळे आरोपींनी व्यावसायिकाला मारहाण करत सोन्याचे दागिने व रोकड जबरीने हिसकावून नेल्याचा प्रकार घडला आहे.
फिर्यादी रोहन प्रकाश शिंदे (रा. वाघोली) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते किआँन इंडिया प्रा.लि. कंपनी (कोरेगाव भीमा) येथे १ सप्टेंबरपासून केटरींगचे काम पाहत आहेत. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.४५ वाजता कंपनीच्या गेटवर गणेश फडतरे, विशाल शिवले व एक अनोळखी व्यक्ती यांनी त्यांना बोलावून जबरदस्ती इनोव्हा गाडीत बसवून त्यांच्या ऑफिसमध्ये नेले. तिथे “काम चालू ठेवायचे असेल तर दरमहा एक लाख रुपये द्यावे लागतील” अशी धमकी दिली.
फिर्यादीने नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांचा पाठीमागून पाठलाग करून गाडीने धडक दिली. खाली पडल्यावर लाकडी दांडक्याने मारहाण करून उजव्या पायाला, पाठीस तसेच कानावर मार लागून दुखापत झाली. यावेळी गळ्यातील सुमारे पाच तोळे सोन्याची चैन (अंदाजे तीन लाख रुपये किंमत) व पँटच्या खिशातील दहा हजार रुपयांचे पाकीट हिसकावून नेण्यात आले. या घटनेनंतर शिंदे यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. शिक्रापूर पोलिसांनी गणेश फडतरे, विशाल शिवले व एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक डोंगरे हे करत आहेत.
शिरूर तालुक्यात गुटखा माफियांना अभय, पोलिसांच्या निष्क्रीयतेविरोधात संतापाची लाट
शिरूर शहरात अमोल ज्वेलर्सवर धाडसी दरोडा; मालकाने गॅलरीतून पाहिले अन्…
शिरूर पोलिसांत माजी आमदारासह अकरा जणांवर गुन्हा
शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अंमली पदार्थ विक्रीत युवक जेरबंद…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…