महाराष्ट्र

जिल्हाधिकाऱ्यांचा माणुसकीचा स्पर्श! सेवानिवृत्त पीएला स्वतः वाहन चालवत घरी सोडले

मुंबई: प्रशासनात सांघिक भावना जोपासत प्रत्येक काम मनापासून करणारे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच, माणुसकीने ओथंबलेला पैलू सोमवारी (ता. २) महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनुभवला.

३५ वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झालेले जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक (पीए) दत्तात्रय कुलकर्णी यांच्या सेवापूर्तीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र, या सत्कारानंतर घडलेल्या एका साध्या पण भावनिक घटनेने संपूर्ण प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले.

सत्कारानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास जिल्हाधिकारी पुजार यांनी कुलकर्णी व त्यांच्या पत्नींना स्वतःच्या शासकीय वाहनातून घरी सोडण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, पुजार यांनी कुलकर्णी दांपत्याला वाहनाच्या मागील सीटवर स्वतःच्या जागेवर बसवले, तर स्वतः अंगरक्षकाच्या जागेवर बसून त्यांना घरी पोहोचवले. कुलकर्णी दांपत्याला सुरक्षितपणे घरी सोडल्यानंतरच पुजार आपल्या शासकीय निवासस्थानी परतले.

पीए म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचा उजवा हात मानला जातो. दिवसभरातील कामांचे नियोजन, महत्त्वाच्या बैठका, सुनावण्या, दूरध्वनी, विविध विभागांकडून आलेल्या संचिकांचा निपटारा अशा अनेक जबाबदाऱ्या पीएला एकाच वेळी पार पाडाव्या लागतात. कार्यालयीन वेळेपलीकडेही जिल्हाधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात राहून काम करावे लागल्याने दोघांमध्ये एक अतूट व्यावसायिक व भावनिक नाते तयार होते.

अशाच प्रामाणिकपणे आणि समर्पणाच्या भावनेतून सेवा बजावणारे दत्तात्रय कुलकर्णी शनिवारी (ता. ३१) सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत जिल्हाधिकारी पुजार यांनी दिलेला हा आगळावेगळा आणि सन्मानपूर्वक निरोप प्रशासनात मानवी संवेदनांचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला असून, दिवसभर जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात या घटनेची चर्चा रंगली होती.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

12 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

12 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

12 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

12 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

12 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

12 तास ago