हवेली: कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील प्रयागधाम (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला काळीमा फासणारा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मतदान सुरू असतानाच बोगस ओळखीच्या आधारे मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा संशयित मतदारांपैकी तिघांना भरारी पथकाने रंगेहाथ पकडले असून, उर्वरित तिघे घटनास्थळावरून पसार झाले आहेत. या प्रकरणाची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समोर आणली.
स्थानिक नागरिक आणि सजग मतदारांनी काही व्यक्तींविषयी संशय व्यक्त केल्यानंतर ही बाब तत्काळ निवडणूक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आली. त्यानंतर भरारी पथकाने तातडीने कारवाई करत बोगस ओळखीवर मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेतले. या संशयितांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.
चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तींकडील ओळखपत्रे संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, गोंधळाचा फायदा घेत इतर तीन संशयित मतदार घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरले.या प्रकारामुळे मतदान प्रक्रियेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निवडणूक यंत्रणेच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे, तर पकडण्यात आलेल्या बोगस मतदारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
दरम्यान, या मतदान केंद्राच्या केंद्र प्रमुखांनी रीतसर तक्रार दाखल केली असून, त्यानुसार संबंधित बोगस मतदारांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली.लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेला गालबोट लावणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…