महाराष्ट्र

गड आला, पण सिंह गेला…

मुंबई: शरद पवारांनी भाकरी फिरवत प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती केलेली आहे. या पदावर आधी जयंत पाटील कार्यरत होते. त्यांच्याच नेतृत्त्वाखाली पक्षानं लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवली. पैकी लोकसभेला पक्षाचा घवघवीत यश मिळालं. तर विधानसभेला पक्षाचा दारुण पराभव झाला. यानंतर आता शरद पवारांनी जयंत पाटील यांच्या जागी शशिकांत शिंदे यांना संधी दिली आहे. ते मूळचे सातारचे आहेत.

शरद पवारांना त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीत साताऱ्यानं कायम साथ दिली आहे. विधानसभेत थेट सहाव्या क्रमांकावर फेकलेल्या पवारांच्या पक्षासमोर आता अस्तित्त्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे. जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून रंगलेल्या आहेत. त्यानंतर आता पवारांनी शशिकांत शिंदे यांच्या रुपात प्रदेशाध्यक्षपदावर निष्ठावंताला संधी दिली आहे.

साताऱ्याच्या कोरेगावातून येणारे शशिकांत शिंदे विधान परिषदेचे आमदार आहेत. १४ मे २०२० रोजी ते आमदार झाले. त्यांचा कार्यकाळ पुढील वर्षी संपेल. याआधी ते २००९ आणि २०१४ मध्ये विधानसभेचे आमदार झाले. जलसंधारण मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पवारांनी त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. त्यावेळी राष्ट्रवादी एकसंध होती. पक्षफुटीनंतर ते शरद पवारांच्या सोबत राहिले.

२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. त्याचवर्षी लोकसभा जिंकलेल्या उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पोटनिवडणूक लागली. पवारांनी त्यांचे मिश्र श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेवेळी पाऊस झाला. शरद पवारांनी पावसात भाषण केलं आणि वातावरण पालटलं.

श्रीनिवास पाटील यांनी भाजपच्या तिकिटावर लढणाऱ्या उदयनराजे भोसलेंचा पराभव केला. त्यांचा पराभव भाजपसाठी मोठा धक्का होता. पण शरद पवारांनी त्यावेळी या विजयाचं सेलीब्रेशन टाळलं. कारण शशिकांत शिंदे या पवारांच्या निष्ठावंत शिलेदाराचा विधानसभेला पराभव झाला होता. शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी त्यांना पराभूत केलं.

पक्षफुटीनंतर शरद पवारांसोबत राहिलेल्या शशिकांत शिंदे यांना पक्षानं २०२४ मध्ये झालेल्या लोकसभेचं तिकीट दिलं. त्यांनी उदयनराजे भोसलेंना कडवी लढत दिली. तुतारीसारखंच चिन्ह घेऊन लढणाऱ्या उमेदवारामुळे शिंदे यांचा पराभव झाला. भोसलेंना ५ लाख ६८ हजार ७४९, तर शिंदे यांना ५ लाख ३६ हजार ४७५ मतं मिळाली. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभेलाही शिंदे पराभूत झाले. सेनेच्या महेश शिंदे यांनी ४५ हजार मतांनी त्यांचा पराभव केला. दोन विधानसभा आणि एक लोकसभा अशा सलग तीन निवडणुका शिंदे यांनी गमावल्या आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

42 मिनिटे ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

46 मिनिटे ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

53 मिनिटे ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

57 मिनिटे ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

6 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

7 तास ago