महाराष्ट्र

कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून या मंत्र्यांना पवित्र करून घ्यावे

कृषिमंत्री यांचा राजीनामा न घेणे म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रती सरकार असंवेदनशील

मुंबई: राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधान करतात, विधी मंडळात कामकाज सुरू असताना रम्मीचा गेम खेळतात आणि सरकार बेजबाबदार मंत्र्यांचा राजीनामा घेत नाही, कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामा न घेणे म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्याप्रती असंनवेदनशील असल्याचे स्पष्ट झाले, अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

मुंबईत पत्रकार परिषदेला संबोधित करताना वडेट्टीवार म्हणाले, राज्याचे गृहराज्यमंत्री डान्सबार चालवतात, एका मंत्र्यांकडे पैश्याचा बॅगा सापडतात पण तरीही यांची पाठराखण जर करण्यात येत असेल तर या सर्व मंत्र्यांवर गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे. लाडकी बहिण म्हणायचे आणि बारमध्ये बहिणींना नाचवायचे असा किळसवाणा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात कधी झाला नव्हता, अशी टीका विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली. नागपूर मधील बार मध्ये अधिकारी फाईली घेऊन बसतात, गडचिरोलीचे ते अधिकारी असल्याची माहिती समोर येते. गडचिरोलीचे पालकमंत्री मुख्यमंत्री आहेत, असा कारभार सुरू असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहे, कंत्राटदार आत्महत्या करत आहे बिल थकली आहेत. राज्यातील शेतकऱ्यांची बँकाकडे ३५ हजार कोटींची थकबाकी आहे. शेतकरी आता कर्ज घेऊ शकणार नाही, शेतकरी अडचणीत आला आहे पण सरकारला त्याचे देणेघेणे नाही.शक्तिपीठ महामार्गाला शेतकरी विरोध करत आहे, तरी त्या महामार्गासाठी सरकार पैसे द्यायला तयार आहे पण शेतकरी कर्जमाफी मागत आहे त्यासाठी सरकार तयार नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

महायुती सरकारमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. बाहेरून दाखवायला सगळ सुरळीत आहे पण आतून प्रचंड असंतोष आहे. या सरकारमधील दोन पक्षांना सत्तेत टिकून रहायचे म्हणून तोंड दाबून मुका मार सहन करत आहे अशी टीका विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

10 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

10 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

11 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

16 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

16 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

16 तास ago