महाराष्ट्र

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली आहेत. त्यामुळे टेरेसवर किंवा पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडू शकत नाही आणि पडलेले सुध्दा नाही. या टाक्यांची स्वच्छता शनिवार दिनांक २५ एप्रिल २०२६ व रविवार दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आली आहेत. त्यामुळे अशा कोणत्याही पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडलेले किंवा मेलेले नाही. सदर व्हायरल झालेला संदेश हा खोटा आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई इलाख्यांच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पत्राद्वारे कळविले आहे की, मागील चार-पाच दिवसांपासून विविध माध्यम तसेच समाजमाध्यमांवर तसेच मंत्रालयीन अधिकारी-कर्मचारी यांच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर एक संदेश व्हायरल झाला असून ज्यामध्ये मंत्रालयाच्या टाकीमध्ये मांजर मरुन पडल्याचा खोटा संदेश फिरत असल्याचे निदर्शनास आले असून जो खोटा आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपूर्वीच मंत्रालय मुख्य व विस्तार इमारतीच्या टेरेसवरील पाण्याच्या सिंटेक्सच्या टाक्या चेक केल्या असून, सदरच्या टाक्या ह्या १० फूट ते १२ फूट उंच असून सर्व टाक्यांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियमांनुसार साधारणता १० ते १५ किलो वजनाची लोखंडी झाकणे बसविलेली आहेत, जी पूर्ण वेळ बंद असतात. तसेच मंत्रालयाच्या टेरेसवरील प्रवेश दरवाजा सुध्दा कायम बंद असतो, काही दुरुस्तीची व अत्यावश्यक कामे करावयाची असल्यासच सदर दरवाजा उघडला जातो.

अशा परिस्थितीमध्ये टेरेसवर किंवा पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडूच शकत नाही आणि पडलेले सुध्दा नाही. तसेच मंत्रालयाच्या तळ जमिनीखालील पाण्याच्या टाक्या देखील शनिवार दिनांक २५ एप्रिल २०२६ व रविवार दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी साफ करण्याचे काम हाती घेण्यात आलेले होते व सर्व टाक्या चेक करुन साफ केलेल्या आहेत, त्यामुळे अशा कोणत्याही पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडलेले किंवा मेलेले नाही. सदर वायरल झालेला संदेश हा खोटा आहे, असे त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

1 तास ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

8 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

9 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

1 दिवस ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago