शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्य शासनाच्या महत्त्वाच्या महा-ऑनलाईन पोर्टलचा सर्व्हर गेल्या तीन दिवसांपासून पूर्णपणे बंद असल्याने विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सर्व्हर मेंटेनन्सच्या कामामुळे पोर्टल बंद असल्याची माहिती समोर आली असून, ते नेमके कधी सुरळीत होईल याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून महा-ऑनलाईनसह विविध शासकीय पोर्टल्स ठप्प आहेत. यामुळे उत्पन्न दाखले, रहिवासी दाखले, डोमिसाईल, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमी लेयर, प्रतिज्ञापत्र तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे मिळविण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. अनेक नागरिकांची तातडीची कामे प्रलंबित राहिली असून, विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वच घटक त्रस्त झाले आहेत.
दरम्यान, संबंधित तांत्रिक पथकाकडून समस्या सोडविण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पोर्टल लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी, ते नेमके कधी पूर्ववत होईल याबाबत निश्चित वेळ देणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संयम ठेवून सहकार्य करावे, थोड्याच दिवसांत सर्व्हर सुरू होऊन प्रलंबित कामे मार्गी लागतील, असे शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले. मात्र, वारंवार होणाऱ्या अशा तांत्रिक अडचणींमुळे शासनाच्या ऑनलाईन सेवांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…
ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…
मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…
शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…
मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…