महाराष्ट्र

मनसेचा नेता थेट आयुक्तांच्या अंगावर धावून गेला अन् म्हणाला…

पुणे: राज्यभर चाललेल्या मराठी अमराठीचा वाद आता पुणे महापालिकेमध्ये देखील रंगल्याचे पाहायला मिळाल. महापालिका आयुक्तांची बैठक सुरू असतानाच मनसेचे काही पदाधिकारी थेट बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले. त्या ठिकाणी बैठक सुरू असल्याचं सांगत या पदाधिकाऱ्यांना हटकलं असता आयुक्त आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.

हा वाद इतका विकोपाला गेला की मनसेच्या नेत्याने थेट आयुक्तांच्या अंगावर धाव घेतली. यामुळे क्षणभर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर आयुक्तांनी देखील उत्तर देताना तुम्ही लोक महाराष्ट्र संस्कृतीला बदनाम करणारे गुंड आहात असे म्हटल्याने वातावरण चांगलेच गरम झाले आहे. यामुळे महापालिकेत झालेल्या या वादाला आता मराठी विरुद्ध अमराठी असा राजकीय रंग चढण्याची शक्यता असून राज्यातील वातावरण तापण्याची चिन्हं आहेत.

असा घडला घटनाक्रम

आयुक्त नवल किशोर राम हे स्वच्छता अभियानासंदर्भात 30 ते 40 वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत होते. अशातच मनसेचे नेते किशोर शिंदे हे आपल्या कार्यकर्त्यांसह दालनात घुसले. अचानक घोळका आल्याने आयुक्तांनी विचारले, “तुमचे काम काय आहे?” यावर शिंदे म्हणाले, “मी माजी नगरसेवक आहे. मी चार वेळा विधानसभा निवडणुकीत देखील लढली असल्याचं त्यांनी आयुक्तांना सांगितलं.” त्यावर आयुक्तांनी त्यांना बैठक सुरू असून तुमचं काय काम आहे ते सांगा असं विचारलं. यामुळे संतप्त झालेल्या शिंदे यांनी थेट आयुक्तांच्या खुर्चीकडे धाव घेत त्यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला होता.

यावेळी चाललेला गोंधळ पाहून त्या ठिकाणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत शिंदे यांना रोखले. यावेळी आयुक्त नवल किशोर राम यांनी “आप बाहर निकल जाओ” असे हिंदीत म्हटल्यावर शिंदे यांनी या वाक्याला आक्षेप घेत “तुम्ही महाराष्ट्रात आहात, मराठीत बोला!” अशी मागणी केली. पुढे वाद वाढत जाऊन, “मी तुला बाहेर पाठवीन” अशी धमकी वजा इशारा राम यांनी दिला. यावर शिंदे यांनी “मी घरात घुसून मारेन” अशी धमकी दिल्याचा आरोप आयुक्त राम यांनी केला आहे.

शिंदेंचा आरोप, आयुक्तांचा प्रतिउत्तर

घटनेनंतर माध्यमांशी बोलताना किशोर शिंदे म्हणाले, “मी माजी नगरसेवक आहे, हे मी त्यांना सांगितले तरी देखील महापालिका आयुक्त उद्धटपणे वागले. त्यांनी मला धमकी दिली. हवे तर महापालिकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासावे.”, अशीही मागणी शिंदे यांनी केली. तर दुसरीकडे, आयुक्त नवल किशोर राम यांनी शिंदे यांच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले की, “महाराष्ट्रात मी अनेक वर्षे काम केलं आहे. मात्र बैठकीदरम्यान अशाप्रकारे कुणीही जबरदस्तीने घुसलेले कधी मी पाहिलेलं नव्हते. त्यामुळे शिंदे हे मराठी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात असे वाटतं नाही. ते सरळ सरळ गुंडागर्दीवर उतरले होते. मी त्यांच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले असल्याचं नवल किशोर राम यांनी सांगितलं. या घटनेमुळे महापालिकेच्या राजकारणात नव्याने वादाची ठिणगी पडली असल्यास बोलले जात आहे. वादात भाषा आणि प्रांतीय ओळख या मुद्द्यांचा समावेश झाल्यामुळे प्रकरण आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago