महाराष्ट्र

हर्सूलच्या पाडापाडीला अखेर ब्रेक, आधी नोटीस, मगच कारवाई

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान अनेक वेळा वाद निर्माण होत आहेत. महापालिकेच्या आततायी कारवायांमुळे पोलिसांना विरोधाला सामोरे जावे लागत आहे. यावर आता पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे – “आधी नोटीस, मगच कारवाई”.

काय म्हणाले पोलीस आयुक्त

यापुढे कोणतीही थेट पाडापाडी होणार नाही.

प्रत्येक पाडापाडीपूर्वी मालमत्ताधारकाला ७ दिवसांची नोटीस मिळायला हवी

न्यायालयात असलेल्या प्रकरणांमध्ये घाई करू नये

नागरिकांना योग्य वेळ आणि संधी दिली पाहिजे.

मालमत्तेवर मार्किंग करा

शंका असतील तर त्याचे निरसन करा आणि त्यानंतरच कारवाई करा

महापालिका सगळ्या जबाबदाऱ्या टाळून थेट पोलिसांना पुढे करते, ही पद्धत आता चालणार नाही.

नारेगाव घटनेवरही घेतली ठाम भूमिका

नागरी मित्र पथकाने नारेगावमध्ये एका तरुणास लाथा मारल्याप्रकरणी प्रवीण पवार यांनी स्पष्ट केलं, की नागरी मित्र पथकाला कोणत्याही प्रकारच्या कारवाईचा अधिकार नाही. ते फक्त पोलिसांना सहकार्य करण्यासाठी आहेत.

हर्सूलमध्ये ७ दिवस आधी दिली जाईल नोटीस

हर्सूल भागातील पाडापाडीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

आता ७ दिवस आधी नोटीस देण्यात येणार

३०० मालमत्तांवर पाडापाडीची कारवाई होणार

काही नागरिकांनी अतिक्रमण स्वतःहून काढलं

न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या प्रकरणांवर कायदेशीर मार्गानं कारवाई

वास्तुविशारदांची मनमानी थांबवा

पाडापाडीच्या धास्तीने नागरिक महापालिकेकडे आपली बांधकामं नियमित करण्यासाठी अर्ज करत आहेत. यामुळे वास्तुविशारदांची मागणी वाढली. पण ते अनधिकृत दर आकारून लोकांची आर्थिक लूट करत आहेत. कुणी १५ हजार, कुणी २५ हजार रुपये आकारतोय यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने टक्केवारी पद्धतीने दर निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago